• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘मिशन दृष्टि’ मोहिमेत दोंडाईचाच्या आदित्य पाटील यांची जागतिक स्तरावर झळाळती कामगिरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
‘मिशन दृष्टि’ मोहिमेत दोंडाईचाच्या आदित्य पाटील यांची जागतिक स्तरावर झळाळती कामगिरी
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

दोंडाईचा | प्रतिनिधी

उत्तर महाराष्ट्रातील दोंडाईचा येथील युवा अभियंता आदित्य रविंद्र पाटील यांनी भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन दृष्टि’ उपग्रह मोहिमेत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून उल्लेखनीय योगदान देत दोंडाईचा शहराचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

भारताच्या वेगाने प्रगती करणाऱ्या खाजगी अंतराळ क्षेत्रात मिशन दृष्टि ही ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे. बेंगळुरूस्थित स्पेस-टेक स्टार्टअपने विकसित केलेला हा उपग्रह जगातील पहिला OptoSAR (ऑप्टिकल + SAR) तंत्रज्ञानावर आधारित उपग्रह असून, त्यामध्ये इलेक्ट्रो-ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) सेन्सर्सचा एकत्रित वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हा उपग्रह कोणत्याही हवामानात तसेच दिवसा-रात्री अचूक माहिती संकलित करण्यास सक्षम ठरणार आहे.

हा उपग्रह पर्यावरणीय बदलांचे निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन, शेती, संरक्षण व्यवस्था आणि पायाभूत सुविधांवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ढगाळ वातावरण, अंधार किंवा प्रतिकूल हवामानातही सातत्याने निरीक्षण करण्याची क्षमता असल्याने हा उपग्रह पारंपरिक प्रणालींपेक्षा अधिक प्रभावी मानला जात आहे.

या अत्याधुनिक मोहिमेत आदित्य पाटील यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उपग्रहाच्या डेटा प्रोसेसिंग, अचूक माहिती संकलन आणि प्रणाली कार्यक्षमतेत त्यांच्या योगदानामुळे मोठी भर पडली आहे. त्यांच्या या यशामुळे दोंडाईचा शहरासह संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आदित्य पाटील हे रोटरी स्कूलच्या शिक्षिका उर्मिला पाटील आणि रोटरी सिनियर्सचे माजी अध्यक्ष रविंद्र सिताराम पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी प्राथमिक शिक्षण दोंडाईचा येथे पूर्ण करून अभियांत्रिकी शिक्षण घेतले असून, सध्या ते एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांची प्रगती आणि अभ्यासू वृत्तीमुळे ते युवा अभियंता म्हणून ओळखले जातात.

त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार भाऊ रावल, उद्योगपती सरकार साहेब रावल, दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा नयनकुंवर रावल, रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष प्रविण महाजन, डॉ. मुकुंद सोहनी, राजेश मुणोत, सुरेश जैन, हिमांशु शाह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

मिशन दृष्टि मोहिमेच्या यशामुळे भारताच्या खाजगी अंतराळ क्षेत्राला मोठी चालना मिळाली असून देशाच्या तांत्रिक क्षमतेचा जागतिक स्तरावर ठसा उमटला आहे. आदित्य पाटील यांसारख्या तरुण अभियंत्यांचे योगदान या यशामध्ये अत्यंत मोलाचे ठरत आहे.

✍️ श्री पांडुरंग शिंपी, प्रतिनिधी – दोंडाईचा

Tags: Pandhurang Shimpi
Previous Post

ताडपिंपळगाव येथे महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी; विविध मान्यवरांची उपस्थिती

Next Post

वेळ आणि पैसा यांची बचत व्हावी हेच शिबिराचे उद्दिष्ट – तहसीलदार अभय मस्के

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
11
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
50
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post

वेळ आणि पैसा यांची बचत व्हावी हेच शिबिराचे उद्दिष्ट – तहसीलदार अभय मस्के

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In