• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

टायर फुटल्याने लक्झरी बस उलटली; एक ठार, ७ गंभीर तर २० जण जखमी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 11, 2026
in Blog
0
टायर फुटल्याने लक्झरी बस उलटली; एक ठार, ७ गंभीर तर २० जण जखमी
0
SHARES
56
VIEWS
Ad 1

चांदवडजवळ मध्यरात्री भीषण अपघात; प्रवाशांमध्ये एकच आरडाओरड

चांदवड : प्रतिनिधी

चांदवड येथील हॉटेल निकिता जवळ मालेगावकडून नाशिककडे जाणारी लक्झरी बस शनिवार (दि. ९ मे) रोजी मध्यरात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास भीषण अपघातग्रस्त झाली. भरधाव वेगाने धावणाऱ्या बसचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावर उलटली.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

या भीषण अपघातात पुणे येथील राजेंद्र अमरसिंग सोळुंकी (वय ६०) यांचा मृत्यू झाला असून ७ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच २० हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

अपघातग्रस्त लक्झरी बस क्रमांक MH-18 BG / 4005 ही मालेगावकडून नाशिकच्या दिशेने जात होती. अचानक टायर फुटल्याने बस डिव्हायडरलगत उलटली आणि प्रवाशांमध्ये एकच आरडाओरड सुरू झाली.

अपघाताची माहिती मिळताच हायवे रुग्णवाहिका, पेट्रोलिंग टीम तसेच स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने चांदवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींवर प्राथमिक उपचार सुरू असून काहींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. हायवे रिकव्हरी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त बस रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

जखमी प्रवाशांची नावे :

शोभा विजय बिरारी (रा. रावळगाव), पंकज मनोहरसिंग पाटील (रा. पुणे), नितीन वामन कु-हाडे (रा. वणी), विजय तुळशीराम बिरारी (रा. रावळगाव), राजेंद्र अमरजित सोळंकी (रा. पुणे), दर्शन भगवान पाटील (रा. पुणे), मिथून तापीराम गिल (रा. आरवी), जयश्री चंद्रकांत पाटील (रा. आरवी), संगिता भगवान पाटील (रा. चुंबाळे), देवयानी पंकज पाटील, कल्पना अशोक चिले (रा. आरवी), तुषार तापीराम गिल (रा. पुणे), निंबा शिवाजी पाटील (रा. वणी, धुळे), मेघश्याम सुनील दंगल (रा. सटाणा), भूषण ताराचंद पाटील (रा. चोपडे), वंदना दिला चव्हाण (रा. पुणे), रेखा करण सोनवणे (रा. सांगवी), अरबाज भिका मेहलाल (रा. शिरपूर), मयूर सूर्यभान जाधव (रा. चांदवड), मनोज सोपान गांगुर्डे (रा. दिघवद), आदित्य राजेंद्र पाटील (रा. पुणे), गौरव कांतीलाल सांळुके (रा. धुळे), दत्तात्रय हनुमंत बर्डे (रा. पुणे), वैष्णवी राजेंद्र पाटील (रा. पुणे), अशोक रुपचंद चित्ते (रा. पुणे), जयदीप सिसोदिया (रा. पुणे), अनिता पाटील (रा. पुणे) आदी प्रवासी जखमी झाले आहेत.

दरम्यान, सोमा टोलचे कर्मचारी निलेश कुलकर्णी, संजय ठाकूर, मिजान घासी, संदेश जाधव, सागर आढाव, तुषार आहिरे, शाहीद कुरेशी व अनिकेत निरभवणे यांनी मदतकार्यात सहभाग घेतला. तसेच पोलिस निरीक्षक कैलास वाघ आणि चांदवड पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.

Previous Post

मिलिंदशेठ भोईटे यांच्याकडून संदीप घोडके कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत

Next Post

करमाळ्यात श्रीराम प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
7
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
27
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
102
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post
करमाळ्यात श्रीराम प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

करमाळ्यात श्रीराम प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In