• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पोलिस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप; न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in Blog
0
0
SHARES
256
VIEWS
Ad 1

इंदापुर:
इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी (संजयनगर) येथील रहिवासी उमेश बाळचंद सपकळ यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे, तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे तसेच पदाचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.
उमेश सपकळ यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता (CRPC) कलम 154 अंतर्गत सविस्तर तक्रार दाखल करून विविध घटनांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे. आपल्या कुटुंबीयांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून, विरोधकांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. तसेच अनेक वेळा पोलीस स्टेशनमध्ये जाऊनही त्यांच्या तक्रारींची योग्य दखल घेतली गेली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
तक्रारीनुसार, शेतातील रस्ता, वाद, धमक्या, मारहाण तसेच महिलांविषयी गैरवर्तन अशा विविध घटनांबाबत पुरावे, व्हिडिओ व लेखी अर्ज सादर करूनही पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या दबावामुळे पोलीस स्टेशनमध्ये सामान्य नागरिकांच्या तक्रारी घेतल्या जात नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

यासंदर्भात उमेश सपकळ यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांना निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच वेळेत न्याय न मिळाल्यास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे इंदापूर तालुक्यात चर्चा रंगली असून, प्रशासनाने या गंभीर आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Previous Post

ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याला नवसंजीवनी ; १० कोटींच्या विकासकामांना गती

Next Post

इंदापूर तालुक्यातील अनियमित वीजपुरवठ्यामुळे जनतेत तीव्र संताप

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
17
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
31
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
11
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
39
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
7
Next Post
इंदापूर तालुक्यातील अनियमित वीजपुरवठ्यामुळे जनतेत तीव्र संताप

इंदापूर तालुक्यातील अनियमित वीजपुरवठ्यामुळे जनतेत तीव्र संताप

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In