• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आशा स्वयंसेविका भरती प्रक्रियेत अडथळ्याचा आरोप; सरपंच व ग्रामसेवकांविरोधात ग्रामस्थांचे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in Blog
0
आशा स्वयंसेविका भरती प्रक्रियेत अडथळ्याचा आरोप; सरपंच व ग्रामसेवकांविरोधात ग्रामस्थांचे निवेदन

filter: 121; fileterIntensity: 0.8; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 65536; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 4194304;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 261.84436;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 65536;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 40;zeissColor: bright;

0
SHARES
122
VIEWS
Ad 1

शिरपूर | प्रतिनिधी
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी, शिरपूर यांच्या मार्फत मौजे महादेव दोंडवाडा (ता. शिरपूर, जि. धुळे) येथे आशा स्वयंसेविका पदासाठी रिक्त जागा जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या पदासाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक असलेला ग्रामपंचायत ठराव देण्यास सरपंच आणि ग्रामसेवक जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

याबाबत मा. गट विकास अधिकारी, पंचायत समिती शिरपूर यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ग्रामसेवक श्री. विजय पाटील व सरपंच सौ. संगीता किसन पावरा हे पात्र महिलांना अर्जासाठी आवश्यक असलेला ग्रामपंचायत ठराव देण्यास नकार देत आहेत. तसेच “कोणाकडेही तक्रार करा, तरी ठराव देणार नाही,” अशा प्रकारची धमकीवजा भाषा वापरून मानसिक दबाव टाकल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

महादेव दोंडवाडाDownload

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित पदावर आपल्या जवळील व्यक्तीस प्राधान्य मिळावे या हेतूने इतर पात्र महिलांना अर्ज प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी दिनांक ५ मार्च २०२६ रोजीही पंचायत समितीकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

तक्रारदारांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत :

  • संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी.
  • संबंधित सरपंच व ग्रामसेवकांना पंचायत समिती कार्यालयात बोलावून पात्र महिलांना त्वरित ग्रामपंचायत ठराव देण्याचे आदेश द्यावेत.
  • पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी संबंधितांवर शिस्तभंगाची व कायदेशीर कारवाई करावी.
  • आवश्यक असल्यास भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करावा.

तसेच, सदर तक्रार केल्याच्या कारणावरून सरपंच, ग्रामसेवक किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून आमच्या किंवा आमच्या कुटुंबातील सदस्यांना कोणतीही धमकी, दबाव, मानसिक त्रास, शारीरिक इजा किंवा शिवीगाळ झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तींवर राहील, अशी नोंदही निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदन सादर करताना ग्रामस्थ नितेश पावरा, देवीलाल पावरा, दीपक पावरा, सागर पावरा, सुरत पावरा, लक्ष्मण पावरा व काजल पावरा आदी उपस्थित होते.

Previous Post

श्री शिवाजी विद्यालय सोनखेड जिल्ह्यात अव्वल; आंबेसांगवीचा श्रीराज सावंत लोहा व कंधार तालुक्यात प्रथम

Next Post

मौजे बीड पिंगळे येथील फेरफार प्रकरण गाजले; प्ले ग्राउंड व म्हाडा आरक्षण वाचविण्याची मागणी

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
17
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
31
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
11
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
39
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
7
Next Post
मौजे बीड पिंगळे येथील फेरफार प्रकरण गाजले; प्ले ग्राउंड व म्हाडा आरक्षण वाचविण्याची मागणी

मौजे बीड पिंगळे येथील फेरफार प्रकरण गाजले; प्ले ग्राउंड व म्हाडा आरक्षण वाचविण्याची मागणी

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In