• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त व आत्मविश्वासामुळेच यश मिळते – राजकिशोर मोदी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त व आत्मविश्वासामुळेच यश मिळते – राजकिशोर मोदी
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

अंबाजोगाई | प्रतिनिधी

अंबाजोगाई येथील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बुधवारी उत्साहात गुणगौरव करण्यात आला.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मिटिंग हॉल येथे आयोजित कार्यक्रमात संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, मार्गदर्शक प्रा. वसंतराव चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना संस्थापक सचिव राजकिशोर मोदी म्हणाले की, “विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त व आत्मविश्वास अत्यंत आवश्यक आहेत. अपयशाला न घाबरता ध्येय निश्चित करून चिकाटीने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते. पालक आणि शिक्षकांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांचा यशाचा मार्ग अधिक सुलभ होतो.”

ते पुढे म्हणाले की, अंबाजोगाई शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांनी राज्यभरात शहराचे नाव उंचावले असून, त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ कटिबद्ध असून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण, विविध सुविधा व नव्या युगाशी सुसंगत अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जात आहेत.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका सौ. अंजली संजय लोहिया यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित गुरुजनांचाही सन्मान करण्यात आला.

यानंतर दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा फेटा बांधून, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे आदित्य जिजाराम कावळे, ऋत्विज दत्तात्रय कुलकर्णी, कौस्तुभ ज्ञानेश मातेकर तसेच जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विविध शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

विद्यार्थी व पालकांनीही मनोगत व्यक्त करत संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विनायक मुंजे यांनी केले, तर सूत्रसंचालन राजेश कांबळे यांनी केले. आभार आंबाड सर यांनी मानले.

या कार्यक्रमास श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भुषण मोदी, शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार, पत्रकार, शिक्षक, पालक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सौ. अंजली लोहिया यांचा गौरव

Next Post

बेलखेड येथे आजही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
7
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
1
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
22
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
4
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
100
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
45
Next Post
बेलखेड येथे आजही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

बेलखेड येथे आजही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In