• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोपरखैरणे–मुंबई पोलीसांमध्ये ढकलाढकली; पीडित महिलेचा प्रश्न—न्याय मागायचा कुणाकडे?

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

नवी मुंबई प्रतिनिधी

कोपरखैरणे आणि मुंबई पोलीस ठाण्यांमध्ये जबाबदारी ढकलली जात असल्याने एका पीडित महिलेची अवस्था “ना घर का, ना घाट का” अशी झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून कोपरखैरणे परिसरात वास्तव्यास असलेल्या या महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा तिचा आरोप आहे.
पीडितेने एफआयआर नोंदवण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. संबंधित अर्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते यांच्याकडे चौकशीसाठी आला; मात्र जबाब नोंदवूनही तो पुढील मान्यतेसाठी वरिष्ठांकडे न पाठवता प्रलंबित ठेवल्याचा आरोप पीडितेकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलीस आयुक्त कार्यालयाच्या सूचनेनंतर पीडित महिलेने कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांची भेट घेतली. मात्र, “हा प्रकार मुंबई हद्दीत येतो, तिथे जा” असे सांगण्यात आल्याचे पीडितेचे म्हणणे आहे. दुसरीकडे, मुंबईतील संबंधित पोलीस ठाण्यात गेल्यानंतर “हा गुन्हा कोपरखैरणे हद्दीतला आहे, तिथेच तक्रार करा” असा सल्ला देण्यात आला. यामुळे पीडित महिला संभ्रमात सापडली असून न्यायासाठी धावपळ सुरूच आहे.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात


पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, हितेन झेवेरी नावाच्या व्यक्तीने विवाहाचे आमिष दाखवून दीर्घकाळ सहजीवन ठेवले आणि फसवणूक केली. २००२ ते २०२४ या काळात विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप तिने केला आहे.
दरम्यान, “झिरो एफआयआर” या तरतुदीनुसार कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवता येतो आणि पोलिसांनी तक्रार नाकारणे कायद्याचा भंग ठरतो. असे असताना संबंधित प्रकरणात पीडितेला एका ठाण्यातून दुसऱ्याकडे पाठवले जात असल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या प्रकरणाची दखल पोलीस आयुक्तांनी घेतल्याची माहिती असून तपासासाठी पोलीस उपायुक्तांना निर्देश देण्यात आल्याचे समजते. पीडितेला न्याय कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

तिलारी घाटाच्या धोकादायक वळणावर अवजड वाहन अडकले; वाहतूक ठप्प

Next Post

वरकुटे मलवडी येथे रंगणार कुस्तीचा महासंग्राम

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
69
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
10
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
22
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
14
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
24
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
वरकुटे मलवडी येथे रंगणार कुस्तीचा महासंग्राम

वरकुटे मलवडी येथे रंगणार कुस्तीचा महासंग्राम

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In