• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा तालुका अखेर टोलमुक्त; स्थानिक नागरिक आणि ऊस वाहतुकीला मोठा दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
आजरा तालुका अखेर टोलमुक्त; स्थानिक नागरिक आणि ऊस वाहतुकीला मोठा दिलासा
0
SHARES
83
VIEWS
Ad 1

आजरा : प्रतिनिधी

आजरा तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, तालुका अखेर टोलमुक्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या टोलविरोधी आंदोलन आणि चर्चेनंतर शुक्रवारी महामार्ग अधिकारी, टोल प्रशासन आणि टोल विरोधी समिती यांच्या संयुक्त बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

तहसीलदार समीर माने यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्थानिक नागरिक तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना टोलमधून पूर्णपणे माफी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय

  • स्थानिक नागरिकांना टोलमाफी
    आजरा तालुक्यातील नागरिकांच्या खासगी चारचाकी वाहनांकडून टोल आकारला जाणार नाही. यासाठी वाहनाचे ‘MH-09’ पासिंग असणे आवश्यक राहणार आहे. इतर पासिंगच्या वाहनांसाठी संबंधित गावच्या सरपंचांचा दाखला सादर करावा लागणार आहे. तसेच आधारकार्ड, फास्टॅग आणि आरसी बुकची झेरॉक्स जमा करणे बंधनकारक राहील.
  • ऊस वाहतुकीस पूर्ण सूट
    ऊस हंगामात कारखान्याकडे जाणाऱ्या ऊस वाहतूक वाहनांना पूर्ण टोलमाफी देण्यात आली आहे. संबंधित साखर कारखान्यांनी वाहनांची अधिकृत यादी टोल प्रशासनाला देणे आवश्यक राहणार आहे.
  • व्यावसायिक वाहनांना ५० टक्के सवलत
    पिवळ्या नंबर प्लेटच्या व्यावसायिक वाहनांसाठी टोल प्रशासनाकडून ५० टक्के सवलतीचा मासिक पास उपलब्ध करून दिला जाणार आहे.
  • प्रलंबित कामे आठवड्यात पूर्ण करण्याचे आश्वासन
    पंचायत समिती परिसरातील रस्त्यावर वाहणारे पाणी, गटारी दुरुस्ती, पथदिवे तसेच पश्चिम भागातील प्रलंबित कामे पुढील आठवडाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन टोल प्रशासनाने दिले.

१५ दिवसांनी पुन्हा होणार आढावा बैठक

सध्या टोल नाक्यावरील अंतर्गत कामांसाठी प्रशासनाला मुभा देण्यात आली असून, येत्या १५ दिवसांनंतर पुन्हा संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. त्यावेळी आश्वासन दिलेल्या कामांचा आढावा घेऊन टोल प्रत्यक्ष सुरू करायचा की नाही याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या बैठकीत कॉ. संपत देसाई, नगरसेवक परशुराम बामणे, रविंद्र भाटले, प्रभाकर कोरवी, प्रकाश मोरुसकर, युवराज पोवार यांनी सक्रिय सहभाग घेत जनतेची बाजू प्रभावीपणे मांडली. यावेळी मुकुंद देसाई, राजू होलम, काशिनाथ मोरे, युवराज जाधव यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

महाबळेश्वरमध्ये वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दंडुका; ट्रिपल सीट व विनापरवाना वाहनचालकावर कारवाई

Next Post

“माझे गाव, डेंग्यूमुक्त गाव!” — प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगीचा अभिनव उपक्रम

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
56
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
16
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
7
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
16
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
“माझे गाव, डेंग्यूमुक्त गाव!” — प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगीचा अभिनव उपक्रम

“माझे गाव, डेंग्यूमुक्त गाव!” — प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगीचा अभिनव उपक्रम

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In