• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुणे शहर पोलीस आयुक्तालयात मोठे फेरबदल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in Blog
0
पुणे शहर पोलीस आयुक्तालयात मोठे फेरबदल
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

संजय दराडे पुण्याचे नवे सहपोलीस आयुक्त

तेजस्वी सातपुते यांच्याकडे गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रतिनिधी :: पुणे :
राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने जारी केले असून पुणे शहर पोलीस आयुक्तालयात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. या बदल्यांमुळे पोलीस दलात नव्या जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले असून अनुभवी अधिकाऱ्यांवर महत्त्वाची पदे सोपवण्यात आली आहेत.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांची पुणे शहरात सहपोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच पुणे शहर गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांच्या जागी राज्य राखीव पोलीस बलातील गट क्रमांक एकच्या समादेशक तेजस्वी सातपुते यांची बदली करण्यात आली आहे. संवेदनशील तपास आणि प्रशासकीय कामकाजातील अनुभव लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (CID) बदली करण्यात आली आहे. तसेच जिंतूर येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले जीवन देवाशीष बेनिवाल यांची पुणे शहर पोलीस दलात उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अचलपूर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांची पुणे ग्रामीणच्या अतिरिक्त अधीक्षकपदी बदली करण्यात आली असून ठाणे पोलीस आयुक्तालयातील अतिरिक्त आयुक्त एस. व्ही. पाठक यांची पुणे शहर राज्य अन्वेषण विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय राज्य गुन्हे अन्वेषण विभागात अधीक्षक पदावर कार्यरत असलेले एमसीडी महेश रेड्डी यांची सीआयडीमध्ये उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे.

राज्य शासनाने केलेल्या या बदल्यांमुळे पुणे शहर पोलीस दलात नवीन ऊर्जा निर्माण होणार असल्याची चर्चा असून गुन्हेगारी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था तसेच संवेदनशील प्रकरणांच्या तपासात अधिक गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

धाराशिवच्या अपर पोलीस अधीक्षकपदी सचिन पांडकर यांची नियुक्ती

Next Post

१८ मे रोजी तोफखाना व गोळीबाराची प्रात्यक्षिके; नागरिकांनी सतर्क राहावे

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
42
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
1
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
47
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
14
Next Post
१८ मे रोजी तोफखाना व गोळीबाराची प्रात्यक्षिके; नागरिकांनी सतर्क राहावे

१८ मे रोजी तोफखाना व गोळीबाराची प्रात्यक्षिके; नागरिकांनी सतर्क राहावे

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In