• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कणकवलीत शिवसेनेचे जोरदार आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात कणकवलीत शिवसेनेचे जोरदार आंदोलन
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

मा. आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरोधात घोषणाबाजी

कणकवली | प्रतिनिधी
पेट्रोल, डिझेल, सीएनजी व गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज कणकवली येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

“कहा गये अच्छे दिन?” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कणकवली एसटी स्टॅन्ड ते पटवर्धन चौकापर्यंत पदयात्रा काढत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी “पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा”, “महागाईने जनता होरपळली” अशा आशयाचे फलक झळकवत निषेध नोंदविला.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

यावेळी बोलताना वैभव नाईक म्हणाले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि गॅसच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. जर नागरिकांनी आताच आवाज उठवला नाही, तर भविष्यात आणखी मोठी दरवाढ होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

“पंतप्रधान मोदी यांनी अच्छे दिनचे आश्वासन दिले होते, ते आता कुठे गेले?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारवर टीका केली. तसेच मंत्री, खासदार आणि आमदार मोठमोठे ताफे घेऊन फिरत असताना सामान्य जनता मात्र महागाईच्या झळा सहन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या काळात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनात महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुका संघटक राजू राठोड, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे, तेजस राणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous Post

केंदूर पऱ्हाडवाडीत अधिकमासनिमित्त श्रीमद भागवत कथेचे आयोजन

Next Post

मान्सूनपूर्व तयारीसाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
93
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post
मान्सूनपूर्व तयारीसाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीसाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In