• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुरंदर प्रांत व तहसील कार्यालयाच्या कारभारावर नागरिकांचा संताप; आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
65
VIEWS
Ad 1

पुरंदर | प्रतिनिधी :

पुरंदर उपविभागीय अधिकारी तथा प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालयाच्या कार्यप्रणालीबाबत तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, विविध संघटना आणि नागरिक आंदोलनाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

शासनाने नागरिकांची कामे एकाच ठिकाणी व्हावीत यासाठी पुरंदर येथे भव्य प्रशासकीय इमारत उभारली आहे. या इमारतीत प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, कृषी कार्यालय, नगर भूमापन कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय तसेच सहाय्यक निबंधक कार्यालय कार्यरत आहेत. मात्र, या सर्व सुविधांनंतरही नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याची तक्रार वाढत आहे.

माहिती अधिकारांतर्गत दाखल केलेल्या अर्जांना वेळेत उत्तर दिले जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जन्म-मृत्यू दाखले, जातीचे दाखले आणि महसुली प्रकरणांमध्ये नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचे सांगितले जात आहे. अनेक दाखले “सहीच्या प्रतीक्षेत” असल्याचे कारण देत प्रकरणे प्रलंबित ठेवली जात असल्याचीही तक्रार आहे.

उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला नेहमी कडी लावलेली असते, त्यामुळे अधिकारी कार्यालयात आहेत की नाहीत याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच कार्यालयाबाहेर कर्मचारीही उपलब्ध नसल्याने नागरिकांना माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत.

महसुली खटल्यांचे निकाल महिनोन्‌महिने प्रलंबित ठेवले जात असून, संबंधित पक्षकारांना वारंवार कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. काही नागरिकांनी महसुली निकालांबाबत आर्थिक तडजोडी होत असल्याचा गंभीर आरोप उघडपणे केला आहे.

यापूर्वी आंबोडी येथील नागरिकांनी तहसीलदारांच्या निर्णयाविरोधात तब्बल ३७ दिवस आंदोलन केले होते. त्यानंतर प्रांत कार्यालयाने संबंधित आदेशाला स्थगिती दिली होती. मात्र, या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी कायम आहे.

दरम्यान, पुरंदरच्या तत्कालीन प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या बदलीचा आदेश एका रात्रीत रद्द झाल्याची चर्चा देखील तालुक्यात रंगली असून, त्यामागील कारणांविषयी विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विविध सामाजिक संघटनांनी दिला आहे.

Tags: Purandar Gaikwad
Previous Post

काळज गावात रस्ते अडवण्याचे प्रकार वाढले; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

‘शक्तीपीठ’ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक; पेरणोलीत सर्व्हे रोखण्याचा निर्धार

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
93
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
37
Next Post
‘शक्तीपीठ’ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक; पेरणोलीत सर्व्हे रोखण्याचा निर्धार

‘शक्तीपीठ’ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक; पेरणोलीत सर्व्हे रोखण्याचा निर्धार

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In