• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दुर्बळ्या गावात रेशन वाटपात भ्रष्टाचाराचा आरोप; लाभार्थ्यांची अधिकाऱ्यांकडे तक्रार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
दुर्बळ्या गावात रेशन वाटपात भ्रष्टाचाराचा आरोप; लाभार्थ्यांची अधिकाऱ्यांकडे तक्रार
0
SHARES
263
VIEWS
Ad 1

शिरपूर : प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दुर्बळ्या गावातील रेशन दुकान क्रमांक १४९८१६१०००१३ येथे रेशन वाटप प्रक्रियेत अनियमितता व भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप गावातील लाभार्थ्यांनी केला आहे. या संदर्भात २१ मे २०२६ रोजी तहसीलदार शिरपूर, उपविभागीय अधिकारी शिरपूर तसेच जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

तक्रारीनुसार, संबंधित रेशन दुकान चालक श्रीमती लताबाई वसंत पावरा या शासनाकडून मिळणारे धान्य नियमानुसार वाटप करत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वीही तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

लाभार्थ्यांनी सांगितले की, PHH (Priority Households) आणि AAY (Antyodaya Anna Yojana) योजनेअंतर्गत ठरलेल्या प्रमाणात धान्य मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात कमी धान्य दिले जात आहे. “आम्हाला पुढूनच कमी धान्य आले आहे” किंवा “एडजस्ट करून घ्या” अशी उत्तरे दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

तसेच रेशन वाटपाची पावती दिली जात नसल्याचे आणि प्रश्न विचारल्यानंतर वाटप थांबवले जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अनेक लाभार्थी अशिक्षित असल्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

शासनाच्या प्रणालीवर अंगठा घेऊन पूर्ण धान्य वितरित झाल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात कमी धान्य मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित रेशन दुकानाला पूर्वी काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली होती, ती पुन्हा एकदा करण्यात आली आहे.

या प्रकरणी तातडीने चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, तसेच रेशन वाटपात पारदर्शकता आणावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

निवेदन सादर करताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी, युवा प्रदेश महासचिव महाराष्ट्र राज्य ॲड. दारासिंग पावरा, उपसरपंच साहेबराव पावरा आणि भावसिंग पावरा उपस्थित होते.

Previous Post

श्रीक्षेत्र भीमाशंकरमध्ये विकासकामांना कासवगती; समन्वयाअभावी कामे रखडली

Next Post

पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशनवर भ्रष्टाचार व मनमानीचा आरोप; नागरिकांकडून गंभीर तक्रारी

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
10
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
46
Next Post

पिंपरी-चिंचवड पोलीस स्टेशनवर भ्रष्टाचार व मनमानीचा आरोप; नागरिकांकडून गंभीर तक्रारी

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In