• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जालना जिल्ह्यात डिझेल टंचाई; ट्रॅक्टर नसलेल्या शेतकऱ्यांनाही डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
जालना जिल्ह्यात डिझेल टंचाई; ट्रॅक्टर नसलेल्या शेतकऱ्यांनाही डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी
0
SHARES
37
VIEWS
Ad 1

जालना : प्रतिनिधी

जालना जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर डिझेल टंचाईची समस्या निर्माण झाली असून, शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडे स्वतःचे ट्रॅक्टर नसल्याने भाडेतत्त्वावर ट्रॅक्टर घेऊन नांगरणी, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर आणि पेरणीची कामे केली जात आहेत. मात्र डिझेल उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे खोळंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

RelatedPosts

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सर्व पेट्रोल-डिझेल पंपधारकांना शेतीसाठी अधिकृत कॅन किंवा बॅरलमधून डिझेल पुरवठा करण्याबाबत निर्देश दिले आहेत. संबंधित शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरचे आरसी बुक आणि Agristack Farmer ID तपासूनच डिझेल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ज्यांच्याकडे Farmer ID उपलब्ध नसेल, त्यांची आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि स्वाक्षरी रजिस्टरमध्ये घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मात्र जिल्ह्यात केवळ ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांकडेच ट्रॅक्टर असल्याचे सांगितले जात आहे. उर्वरित शेतकरी भाड्याने ट्रॅक्टर घेऊन शेतीची मशागत करत आहेत. अशा परिस्थितीत ट्रॅक्टर मालकांकडून “तुम्ही डिझेल आणून द्या, आम्ही मशागत करून देतो,” असे सांगितले जात असल्याने ट्रॅक्टर नसलेल्या शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.

यामुळे सातबाऱ्यावरील क्षेत्रफळानुसार ट्रॅक्टर नसलेल्या शेतकऱ्यांनाही डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच या गंभीर प्रश्नात पालकमंत्री Pankaja Munde यांनी लक्ष घालून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

प्रशासनाने डिझेल वितरणात कोणतीही साठेबाजी, काळाबाजार किंवा गैरव्यवहार होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पेट्रोल पंप चालकांना दिले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ आणि PESO नियमांनुसार कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Tags: Sanjiv Patil
Previous Post

श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे जालना येथे भव्य आयोजन

Next Post

येहळेगाव सोळंके येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
18
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
88
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
26
कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला
ताज्या घडामोडी

कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला

October 5, 2026
0
Next Post
येहळेगाव सोळंके येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ संपन्न

येहळेगाव सोळंके येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ संपन्न

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In