• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चंदगड तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर ६ महिन्यांत प्रभावी कार्यवाही करा; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
चंदगड तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर ६ महिन्यांत प्रभावी कार्यवाही करा; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
0
SHARES
32
VIEWS
Ad 1
Ad 1

चंदगड प्रतिनिधी

प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली चंदगड तालुक्यातील विविध शासकीय विभागांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी पुढील सहा महिन्यांत प्रभावी कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या बैठकीला शिवाजीराव पाटील तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीदरम्यान कृषी, महसूल, शिक्षण, आरोग्य, वन विभाग तसेच इतर प्रमुख शासकीय विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांचे रखडलेले यांत्रिकीकरण अनुदान, वन्यप्राण्यांच्या उपद्रवापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेती कुंपण योजना, ग्रामीण भागातील शाळांची दुरुस्ती, घरकुल योजनेतील रखडलेली कामे, आरोग्य विभागातील समस्या तसेच कंत्राटी कामगारांच्या अडचणी या विषयांवर विशेष चर्चा झाली.

चंदगड तालुक्याला भेडसावणाऱ्या वन्यप्राण्यांच्या उपद्रवाबाबतही गंभीर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.

यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “चंदगड तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. अधिकाऱ्यांनी केवळ कागदी प्रक्रिया न करता प्रत्यक्ष काम करून पुढील सहा महिन्यांत नागरिकांना दिलासा द्यावा.”

बैठकीला प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भावकु गुरव, पंचायत समिती सदस्य रवींद्र बांदिवडेकर, सौ. सुवर्णा कुंभार, सौ. मनस्विनी कांबळे आणि स्वप्निल इंगवले उपस्थित होते.

तसेच चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनील काणेकर, तहसीलदार राजेश चव्हाण, गट विकास अधिकारी वृषाली यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सौमजाळ आणि पोलिस निरीक्षक चौखंडे यांनी प्रशासनाच्या वतीने तालुक्याची माहिती सादर केली.

याशिवाय शांतारामबापू पाटील, दिपक पाटील, चंद्रशेखर पाटील, जयपाल मुन्नोळी, सोमगोंडा आरबोळे, अशोक कदम, संग्रामसिंह अडकुरकर, प्रताप सुर्यवंशी, अंकुश गवस, श्रीशैल नागराळ, बसवराज कंकणवाडी, सौ. भारती जाधव, पत्रकार बांधव, आजी-माजी सैनिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Gopal Gadkari
Previous Post

चंदगडकरांसाठी अभिमानाचा क्षण; ऐतिहासिक कलानंदीगड किल्ला ‘राज्य संरक्षित स्मारक’ घोषित

Next Post

ज्येष्ठ अधिक मासानिमित्त बांबरुड राणीचे येथे श्रीमद् भागवत महापुराण कथा सप्ताह

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
58
Next Post
ज्येष्ठ अधिक मासानिमित्त बांबरुड राणीचे येथे श्रीमद् भागवत महापुराण कथा सप्ताह

ज्येष्ठ अधिक मासानिमित्त बांबरुड राणीचे येथे श्रीमद् भागवत महापुराण कथा सप्ताह

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In