• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बकरी ईद निमित्त विनाकारण होणारी गोवंशहत्या थांबवा : विश्व हिंदू परिषदेचे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
बकरी ईद निमित्त विनाकारण होणारी गोवंशहत्या थांबवा : विश्व हिंदू परिषदेचे निवेदन
0
SHARES
70
VIEWS
Ad 1
Ad 1

जानेफळ | प्रतिनिधी :

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर होणारी विनाकारण गोवंश हत्या तात्काळ थांबवावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने जानेफळ पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गोवंश हत्या ही भारतीय संस्कृती, पर्यावरण, शेती व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी गंभीर बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संविधानाच्या कलम ४८ नुसार राज्यावर गोवंश संरक्षणाची जबाबदारी आहे. तसेच कलम ५१(अ)(ग) अंतर्गत प्रत्येक नागरिकाने सजीव प्राण्यांविषयी करुणा बाळगणे हे कर्तव्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ तसेच प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम १९६० नुसार गोवंश हत्या हा दंडनीय गुन्हा असल्याचेही संघटनेने नमूद केले.

सर्वोच्च न्यायालयाने ‘स्टेट ऑफ गुजरात विरुद्ध मिर्झापूर मोती कुरेशी कसाब’ प्रकरणात गोवंश संरक्षण हे सार्वजनिक हिताचे असल्याचे स्पष्ट केले असल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे.

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी गोवंश हा भारतीय कृषी संस्कृतीचा कणा असून पर्यावरण, सेंद्रिय शेती आणि मानवी आरोग्यासाठी त्याचे संरक्षण आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा आणि महात्मा गांधी यांनीही गोरक्षणाला महत्त्व दिल्याचे नमूद करण्यात आले.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, जिल्ह्यात काही ठिकाणी होणाऱ्या गोवंश हत्येमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहून कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक डॉ. मयूर करे, प्रखंड संयोजक महेश सवडतकर, धीरज ढवळे, गोपाल महाले, विजू काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Ad 1
Tags: Rohit Shinde
Previous Post

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी गावच्या विद्यार्थ्यांचे एटीएस व एटीएसई परीक्षेत यश

Next Post

वाऱ्हा ग्रामपंचायतीमध्ये हयातीचे प्रमाणपत्र व बस कार्ड कॅम्प उत्साहात संपन्न

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
वाऱ्हा ग्रामपंचायतीमध्ये हयातीचे प्रमाणपत्र व बस कार्ड कॅम्प उत्साहात संपन्न

वाऱ्हा ग्रामपंचायतीमध्ये हयातीचे प्रमाणपत्र व बस कार्ड कॅम्प उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In