• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर व डबकी मोर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर व डबकी मोर्चा
0
SHARES
20
VIEWS
Ad 1
Ad 1

डीएपी-युरिया टंचाई, पिक विमा, वीज व डिझेल प्रश्नांवर यवतमाळात काँग्रेसचे आंदोलन

सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी :
यवतमाळ | दि. २६ मे (मंगळवार)

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकलेल्या डीएपी व युरिया खतांच्या कृत्रिम टंचाई, बोगस खते-बियाणे-कीटकनाशकांचा वाढता सुळसुळाट, रखडलेला पिक विमा, वाढते पेट्रोल-डिझेल दर तसेच अपुरा व विस्कळीत वीजपुरवठा या गंभीर प्रश्नांवर आज यवतमाळ शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने आक्रमक ट्रॅक्टर-डबकी मोर्चा काढण्यात आला.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वाखाली तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस तसेच काँग्रेस पक्षाच्या विविध सेल व आघाड्यांच्या वतीने या भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

मोर्चाची सुरुवात यवतमाळ शहरातील मेडिकल चौक, दोन पंजा येथून करण्यात आली. त्यानंतर लाठीवाला पेट्रोल पंप मार्गे संविधान चौक, दत्त चौक आणि महात्मा ज्योतिबा फुले स्मारक परिसरातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ट्रॅक्टर, डबकी आणि जोरदार घोषणाबाजीमुळे संपूर्ण शहराचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले.

आंदोलनानंतर जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देणे, शेतीसाठी रात्रीची सिंगल फेज वीज सुरळीत सुरू करणे, सोयाबीन, कापूस व तूर पिकांचा रखडलेला पिक विमा मंजूर करणे, डीएपी व युरिया खतांचा पुरेसा पुरवठा करणे, बोगस खते-बियाणे-कीटकनाशकांवर कठोर कारवाई करणे, इंधन दरवाढ कमी करणे तसेच शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याच्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी राज्य शासनावर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनीही सरकारने तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.

या मोर्चात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश भिसणंकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. बबलू उर्फ अनिल देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक, विरोधी पक्षनेत्या वैशाली सवाई, स्वाती येंडे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद बगाडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, युवक आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

“शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तात्काळ ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

Ad 1
Tags: Vijay Baraskar
Previous Post

म्हैसाळमध्ये आलिशान बारवर पोलिसांचा छापा; तरुणी व मद्यधुंद ग्राहक ताब्यात

Next Post

आदर्श ग्रामपंचायत पाथ्रड गोळेचा राज्यस्तरीय गौरवाकडे प्रवास; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात तालुक्यात प्रथम क्रमांक

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
58
Next Post
आदर्श ग्रामपंचायत पाथ्रड गोळेचा राज्यस्तरीय गौरवाकडे प्रवास; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात तालुक्यात प्रथम क्रमांक

आदर्श ग्रामपंचायत पाथ्रड गोळेचा राज्यस्तरीय गौरवाकडे प्रवास; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात तालुक्यात प्रथम क्रमांक

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In