लोहारा ता.पाचोरा येथे, महसूल पंधरवाडा -2024 अंतर्गत कृषी मार्गदर्शन कार्यशाळा व डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेची ओळख व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला
लोहारा प्रतिनिधी अनिल तडवी
आज दिनांक 05/08/2024 रोजी महाराष्ट्र शासन महसूल व कृषी विभागा मार्फत महसूल पंधरवाडा 1 ऑगस्ट, ते 15 ऑगस्ट आज लोहारा येथे पंधरवड्या निमित्त शेतकरी मार्गदर्शन व सभा आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाची सुरुवात स्वरस्वती मातेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पाचोरा तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री आर एम जाधव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व नैसर्गिक शेती मिशन योजनेची माहिती दिली यावेळी कृषी भूषण श्री विश्वासराव पाटील यांची उपस्थिती होती तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आर एच जोहरे कृषी सहाय्यक यांनी केले व कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली त्याचप्रमाणे श्री विश्वासराव पाटील यांनी विषमुक्त शेती व शेतीवरील खर्च कसा कमी करावा याविषयी मार्गदर्शन केले यावेळी कुऱ्हाड महसूल मंडळातील श्री भरत राम ननवरे मंडल अधिकारी यांनी महसूल विभागाच्या विविध योजना विषयी माहिती दिली या कार्यक्रमासाठी कुऱ्हाड मंडळातील श्री मोहन कुलकर्णी तलाठी लोहारा श्री उमेश सोनवणे तलाठी कळमसरा नरेंद्र हेमराज पाटील तलाठी म्हसावद कासमपुरा व तलाठी प्रवीण पवार कुऱ्हाड बुद्रुक इत्यादी तलाठी वर्ग कार्यक्रमासाठी हजर होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी मित्र अनिल तडवी उमेश देशमुख दीपक राजपूत विशाल पवार गोपाल राजपूत दिलीप चौधरी पत्रकार दीपक पवार इत्यादींनी परिश्रम घेतले यावेळी गावातील शेतकरी आनंदा नथू माळी ज्ञानेश्वर अरुण सुतार ज्ञानेश्वर देशमुख राजू चौधरी लोटू काळदाते भगवान धनगर, नंदू भाऊ सुर्वे ज्ञानेश्वर माळी श्रीराम कलाल अनिल देशमुख मनोज देशमुख लोटू चौधरी दत्तू शंकर धनराज गुजर संकेत सोनार राजेंद्र सोनार मल्हारी दुधे कोतवाल व गावातील महिला मंडळ उपस्थित होते
Discussion about this post