मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक संपन्न. तालुका प्रतिनिधी सुदर्शन देशमुख कळंब • कळंब – नगर परिषद कळंब अंर्तगत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक दि.५ ऑगस्ट २०३४ रोजी नगर परिषद सभागृहात संपन्न झाली. बैठकीचे अध्यक्ष स्थानी हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कळंब धाराशिव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन लक्ष्मनराव पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नितीन लांडगे युवा सेना कोअर कमेटी सदस्य व धाराशिव जिल्हा निरीक्षक तसेच श्रीमती भारती गायकवाड महिला जिल्हा प्रमुख तसेच संजयजी मुंदडा माजी उपनगर अध्यक्ष नगर परिषद कळंब, सागर मुंडे (सामाजिक कार्यकर्ते) उपस्थित होते. सदरील बैठकीचे प्रस्ताविक प्रशासक तथा मुख्याधिकारी गोपाल तापडिया यांनी केले. या वेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणीच्या सध्य स्थती बाबत इत्यंभूत माहिती घेण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करिता मार्गदर्शन करण्यात आले. तसेच योजने पासून कोणतीही पात्र महिला लाभार्थी वंचित राहणार नाही करिता घरोघरी जाऊन सर्वे करून लाभार्थी यांना योजनेची माहिती देऊन लाभार्थी यांचे अर्ज भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. व योजनेच्या नियुक्त
कर्मचारी यांनी शहरातील संपूर्ण झोन निहाय
लवकरात लवकर यशस्वीरित्या पूर्ण करण्याच्या सूचना न.प. कळंब चे प्रशासक तथा मुख्याधिकारी गोपाल तापडिया यांनी दिल्या. सदरील आढावा बैठकीचे सूत्र संचालन विक्रम समुद्रे (सा. प्रकल्प अधिकारी) यांनी केले. बैठीकी कारिता न.प. अधिकारी तथा कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस व शहरातील सामाजिक कार्यकर्ते व रहिवाशी आदींची उपस्थिती होते. सदरील आढावा बैठकीस उपस्थित मान्यवरांचे आभार एल. एस. वाघमारे (कार्यालयीन अधीक्षक) न.प.यांनी व्यक्त केले.
Discussion about this post