• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

केंद्राने नव्हे थेट.. युनेस्कोने घेतली अहिराणी भाषेची दखल

Rudra by Rudra
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
केंद्राने नव्हे थेट.. युनेस्कोने घेतली अहिराणी भाषेची दखल
0
SHARES
10
VIEWS
Ad 1
Ad 1

खान्देशी अस्मितेचा विजय; अहिराणीला प्रमाण भाषेचा दर्जा मिळवण्यासाठीच्या लढ्याला आंतरराष्ट्रीय पाठबळ

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

| प्रतिनिधी अमर पठारे

खान्देशच्या मातीत रुजलेली आणि लाखो लोकांच्या बोलीत जिवंत असलेली अहिराणी भाषा आता थेट जागतिक पातळीवर पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून युनोच्या युनेस्को संस्थेने अहिराणी भाषेची अधिकृत दखल घेत गौरवपत्र पाठविले आहे. त्यामुळे संपूर्ण खान्देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जगातील विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्यासाठी कार्य करणाऱ्या युनेस्को संस्थेने अहिराणी भाषेच्या जतनासाठी सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, “पहिले विश्व अहिराणी सम्मेलन” आणि अहिराणी साहित्यिकांच्या चळवळीचीही नोंद घेण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ आणि अनेक अहिराणी साहित्यिक गेल्या अनेक वर्षांपासून अहिराणीला प्रमाण भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने लढा देत आहेत. या लढ्याला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याने अहिराणी भाषेच्या भविष्यासाठी नवी आशा निर्माण झाली आहे.

उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले की, “युनेस्कोने घेतलेली ही दखल म्हणजे संपूर्ण खान्देशासाठी अभिमानाची बाब आहे. अहिराणी ही फक्त बोली नसून ती आपल्या संस्कृतीची, इतिहासाची आणि अस्मितेची ओळख आहे.”

दरम्यान, केंद्र सरकारचे भारतीय बोलीभाषा संवर्धन कार्यालय बंगळुरू येथे कार्यरत असून त्या कार्यालयाच्या अधिकारी श्रीमती काटजू यांनीही अहिराणी सम्मेलनाची विशेष नोंद घेतली आहे.

अहिराणी भाषेतील लोककथा, भारुडे, ओव्या, लोकगीतं आणि ग्रामीण संस्कृतीचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी आता नव्या जोमाने प्रयत्न सुरू होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

“एक भाषा… एक अस्मिता… एक संघर्ष…”

अहिराणीला प्रमाण भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सुरू असलेली चळवळ आता अधिक वेगाने पुढे जाणार असून खान्देशातील तरुणांमध्येही याबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

Ad 1
Tags: Amar Pathare
Previous Post

“संतुलित खत वापर जागरूकता अभियान”

Next Post

हर्णे मारहाण प्रकरणी कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल; आरोपी ताब्यात, अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
हर्णे मारहाण प्रकरणी कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल; आरोपी ताब्यात, अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन

हर्णे मारहाण प्रकरणी कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल; आरोपी ताब्यात, अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In