• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या ठिय्या आंदोलनाला यश; सावरगाव, पाडशिंगी येथील विजेचा आणि बससेवेचा प्रश्न सुटणार

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या ठिय्या आंदोलनाला यश; सावरगाव, पाडशिंगी येथील विजेचा आणि बससेवेचा प्रश्न सुटणार
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रदीप ताजने
पातुर ग्रामीण प्रतिनिधी

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

पातुर तालुक्यातील
सावरगाव आणि पाडशिंगी येथील प्रलंबित जनसमस्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री कार्यालयासमोर करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेत कामांचे लेखी आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.
अनेक महिन्यांपासूनचे प्रश्न प्रलंबित
सावरगाव येथे अनेक दिवसांपासून संत सेवालाल महाराज विद्यालयासमोर अतिरिक्त ६३ केव्ही (63 kv) डीपीची गरज होती. कमी व्होल्टेजमुळे नागरिकांना उन्हाळ्यात लाईट, कुलर आणि फॅन वापरताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच पाडशिंगी गावात संत सेवालाल महाराज मंदिरावरून आणि लोकवस्तीवरून गेलेली धोकादायक वीज वाहिनी गावाबाहेरून स्थलांतरित करण्याची मागणी होती. यासोबतच गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली अकोला-पाडशिंगी-पांगरताटी ही बससेवा पूर्ववत सुरू करण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांची होती. सस्ती येथील महावितरण कार्यालयाकडून शासनाकडे याचे प्रस्तावही पाठवले होते, मात्र अनेकदा निवेदने देऊनही दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष होता.

पालकमंत्री कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन
प्रशासकीय अनास्थेला कंटाळून अखेर २२ मे २०२६ रोजी समस्त पाडशिंगी आणि सावरगाव ग्रामस्थांच्या वतीने अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार ठिय्या आंदोलन छेडण्यात आले.
प्रशासनाकडून लेखी आश्वासन आणि आंदोलन मागे
आंदोलनाची तीव्रता पाहून पालकमंत्री आकाश फुंडकर यांचे स्वीय सहाय्यक (PA), महावितरणचे अकोला प्रमुख सपकाळ आणि पातूरचे कार्यकारी अभियंता रंगारी यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. या प्रश्नांवर पालकमंत्री फुंडकर यांच्याशी तातडीने संवाद साधून, ‘आजपासूनच संबंधित कामांना सुरुवात केली जाईल’

अशा आशयाचे लेखी पत्र प्रशासनाकडून आंदोलकांना देण्यात आले. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आंदोलन मागे घेतले. “हा विजय माझा नसून सावरगाव आणि पाडशिंगी येथील सर्व कष्टकरी ग्रामस्थांचा आहे,” अशी भावना निलेश कापकर यांनी विजयानंतर व्यक्त केली.
ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
या आंदोलनात प्रमुख उपस्थिती रामेश्वर सावंत यांची होती. तसेच सावरगाव येथून काशीराम आडे, शंकर जाधव, सागर लाड, गोपाल बोरकर, राहुल पायघन, देविदास चोंढकर, अमोल राठोड, रामधन जाधव, समाधान राठोड, सचिन जाधव तर पाडशिंगी येथून नाईक श्रीचंद पवार, सरपंच प्रवेश सरकटे, गजानन सरकटे, दामोदर राठोड, पांडुरंग चव्हाण, धोंडू चव्हाण, विठ्ठल जाधव, नेमिचंद चव्हाण, संतोष चव्हाण, विनोद चव्हाण, जयसिंग राठोड, पंजाब राठोड, मूलचंद राघो राठोड, मूलचंद सवाई राठोड, दामोदर पवार, मिलिंद सरकटे यांच्यासह दोन्ही गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Pradip Tajne
Previous Post

आलेगाव जि. प. गटाची शिवसेना शिंदेगट पक्षाची आढावा बैठक उत्हासात संपन्न

Next Post

निलेश कापकर यांच्याकडून मोफत टँकरद्वारे पाणी पुरवठा; भीषण पाणीटंचाईत नागरिकांना मोठा दिलासा

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
निलेश कापकर यांच्याकडून मोफत टँकरद्वारे पाणी पुरवठा; भीषण पाणीटंचाईत नागरिकांना मोठा दिलासा

निलेश कापकर यांच्याकडून मोफत टँकरद्वारे पाणी पुरवठा; भीषण पाणीटंचाईत नागरिकांना मोठा दिलासा

ताज्या बातम्या

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In