• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रुटी-इमनगाव तलावाने गाठला तळ; पाणीटंचाईचे गडद सावट

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
रुटी-इमनगाव तलावाने गाठला तळ; पाणीटंचाईचे गडद सावट
0
SHARES
26
VIEWS
Ad 1
Ad 1

रुटी-इमनगाव तलावाने गाठला तळ; पाणीटंचाईचे गडद सावट
केवळ १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक;

(प्रतिनिधी) :- शशिकांत जरांगे

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

आष्टी तालुक्यातील रुटी-इमनगाच तलावातील पाणीसाठ्यात प्रचंड घट झाली असून, तलावाने आता अक्षरशः तळ गाठला आहे. या तलावावर अवलंबून असलेल्या कासारी आणि मुर्शदपूर परिसरासाठी आता केवळ १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

त्यामुळे आगामी काळात पाणीपुरवठा अत्यंत विस्कळीत होण्याची चिन्हे असून, ऐन उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रुटी-इमनगाव तलावातून कासारी आणि मुर्शदपूर या भागाला प्रमुख पाणीपुरवठा केला जातो.

मात्र, सध्या तलावातील पाण्याची पातळी अत्यंत खालावली आहे. उन्हाळ्याची वाढती तीव्रता आणि पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे तलावात जेमतेम १५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक
राहिला आहे.

या गंभीर परिस्थितीमुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन पाहता,

इथून पुढच्या काळात या भागातील नागरिकांना नळाद्वारे केवळ एकच वेळ पाणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राम स्थांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

या भीषण पाणीटंचाईबाबत माहिती देताना सरपंच अशोक मुळे यांनी वस्तुस्थिती मांडली. ते म्हणाले, तलावातील सध्याची

परिस्थिती चिंताजनक आहे. आपल्याकडे केवळ १५ दिवस जाईल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यावर आता मोठ्या मर्यादा येणार आहेत. त्यामुळे पाण्याचे संकट ओळखून प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने नागरिकांना असे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे की, पिण्याचे पाणी अत्यंत काटकसरीने आणि जपून वापरावे. गाड्या धुणे, अंगणात सडा मारणे किंवा इतर गैरसोयीच्या कामांसाठी पिण्याचे पाणी वाया घालवू नये. निसर्गाची साथ मिळेपर्यंत उपलब्ध पाण्याचा थेंब न थेंब जपणे ही आता काळाची गरज बनली आहे. वेळीच पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येऊ शकते.

Ad 1
Previous Post

शहरातील किराणा महागाईने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले!

Next Post

शेंबा ग्रामपंचायतीकडून आयुष्यमान भारत व वंदना कार्ड वाटप मोहीम सुरू

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
शेंबा ग्रामपंचायतीकडून आयुष्यमान भारत व वंदना कार्ड वाटप मोहीम सुरू

शेंबा ग्रामपंचायतीकडून आयुष्यमान भारत व वंदना कार्ड वाटप मोहीम सुरू

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In