• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेंबा ग्रामपंचायतीकडून आयुष्यमान भारत व वंदना कार्ड वाटप मोहीम सुरू

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
शेंबा ग्रामपंचायतीकडून आयुष्यमान भारत व वंदना कार्ड वाटप मोहीम सुरू
0
SHARES
46
VIEWS
Ad 1
Ad 1

निलेश दाभाडे| नांदुरा प्रतिनिधी

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

शेंबा बु. — शेंबा ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांसाठी आयुष्यमान भारत व वंदना कार्ड वाटप मोहीम सुरू करण्यात आली आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेमुळे गरजू व गरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
या मोहिमेदरम्यान प्राथमिक आरोग्य सेवक प्रदीप झनके, प्रतिभा बाजोडे, भारती विठ्ठल दाडगे तसेच आशा वर्कर उपस्थित होत्या. सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

काही दिवसांपूर्वी आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी नागरिकांकडून सुमारे अडीचशे रुपये आकारले जात होते. मात्र आता ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे पात्र लाभार्थ्यांना हे कार्ड मोफत उपलब्ध करून दिले जात आहे. पंचायत समिती नांदुरा यांच्या मार्गदर्शनाखाली शेंबा येथे विशेष मोहीम राबवून नागरिकांची कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमात ग्रामपंचायत सरपंच विजय इगळे, ग्रामसेवक ए. एम. काकडे ग्रामपंचायत लिपिक निलेश दाभाडे तसेच ग्रामपंचायत शिपाई ऋषिकेश तायडे यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.

आयुष्यमान भारत व वंदना कार्डच्या माध्यमातून लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळत आहे. अनेक लाभार्थ्यांची कागदपत्रे प्रलंबित असल्याने त्यांना घरपोच लाभ मिळावा, यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
या मोहिमेमुळे शेंबा परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून अधिकाधिक पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 1
Tags: Nilesh Dabhade
Previous Post

रुटी-इमनगाव तलावाने गाठला तळ; पाणीटंचाईचे गडद सावट

Next Post

हर्णे बंदरातील मारहाण प्रकरणाला नवे वळण; पाच आरोपी अटकेत, एक अल्पवयीन ताब्यात

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

हर्णे बंदरातील मारहाण प्रकरणाला नवे वळण; पाच आरोपी अटकेत, एक अल्पवयीन ताब्यात

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In