• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माहूर शहरातील वार्ड क्र. ४ मधील विविध समस्यांकडे नगर पंचायतचे दुर्लक्ष; नागरिक त्रस्त

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
माहूर शहरातील वार्ड क्र. ४ मधील विविध समस्यांकडे नगर पंचायतचे दुर्लक्ष; नागरिक त्रस्त
0
SHARES
54
VIEWS
Ad 1
Ad 1

तालुका प्रतिनिधी

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

माहूर (प्रतिनिधी) : माहूर शहरातील वार्ड क्र. ४ मध्ये अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात माजी भाजप शहर सरचिटणीस सोनकर प्रमोद अविनाश सोनकर यांनी नगर पंचायत प्रशासनाला निवेदन देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, पौराणिक महत्त्व असलेल्या भानुतीर्थ तलाव परिसरात काही दिवसांपूर्वी सौंदर्यीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र काम अर्धवट अवस्थेत बंद पडल्याने तलाव परिसरात मातीचे ढिगारे काढून जागा खुली झाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसराची स्वच्छता करून तलावाभोवती सुरक्षा कठडे उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच जगदंबा हायस्कूललगत असलेला हातपंप गेल्या महिनाभरापासून नादुरुस्त असल्याने नागरिकांना पाणी भरण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. माहूर शहरातील धरमवाडी, बुद्धपुरा, वडरपुरा, कोलामपुरा, मोमीनपुरा, लकडपुरा, बागवान गल्ली, परधान पुरा यासह अनेक भागांतील नागरिक या हातपंपावर अवलंबून आहेत. मात्र परिसरात मोठ्या प्रमाणात घाण व झाडाझुडपे वाढल्याने साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे.

याशिवाय अंगणवाडीची इमारत मोडकळीस आली असून ती कोसळण्याच्या स्थितीत असल्याने बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच वार्डातील नाल्यांची गेल्या महिनाभरापासून सफाई न झाल्याने नाल्या तुंबून दुर्गंधी पसरली आहे.

या सर्व बाबींची तात्काळ दखल घेऊन नगर पंचायत प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात कोणतीही जीवितहानी अथवा अप्रिय घटना घडल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनाच्या प्रतिलिपी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री मा. एकनाथराव शिंदे, जिल्हाधिकारी नांदेड, तहसीलदार माहूर तसेच आमदार भिमराव केराम यांना देण्यात आल्या आहेत.

Ad 1
Tags: Kundan Tivadkar
Previous Post

चालत्या स्कुटीवरून महिलांचा विनयभंग करणारा विकृत इसम रबाळे पोलिसांच्या ताब्यातसुनील गायकवाड

Next Post

जिंती गावच्या शेतकऱ्यांचा अभिमान; प्रकाशराव रणवरे यांना सोयाबीन पीक स्पर्धेत तालुका स्तरावर तृतीय क्रमांक

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
जिंती गावच्या शेतकऱ्यांचा अभिमान; प्रकाशराव रणवरे यांना सोयाबीन पीक स्पर्धेत तालुका स्तरावर तृतीय क्रमांक

जिंती गावच्या शेतकऱ्यांचा अभिमान; प्रकाशराव रणवरे यांना सोयाबीन पीक स्पर्धेत तालुका स्तरावर तृतीय क्रमांक

ताज्या बातम्या

कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

October 12, 2026
सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक पवित्र कार्य जपत प्रमोद भैया मित्र मंडळ व ESL कंपनीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक पवित्र कार्य जपत प्रमोद भैया मित्र मंडळ व ESL कंपनीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

October 12, 2026
स्विफ्टन लिफ्ट चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व शाळा पुरस्कार श्री मोहटादेवी विद्यालयातील प्राध्यापक सुभाष गवई यांना प्रदान.

स्विफ्टन लिफ्ट चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व शाळा पुरस्कार श्री मोहटादेवी विद्यालयातील प्राध्यापक सुभाष गवई यांना प्रदान.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In