• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कारखान्यांविरोधात विरोधकांची मोट विठ्ठलराव लंघे व प्रभाकर शिंदे यांचा घणाघात

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
कारखान्यांविरोधात विरोधकांची मोट  विठ्ठलराव लंघे व प्रभाकर शिंदे यांचा घणाघात
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

कारखान्यांविरोधात विरोधकांची मोट 💥 विठ्ठलराव लंघे व प्रभाकर शिंदे यांचा घणाघात**
🏵️यंदा तडजोड नाही, निवडणूक लढणारच!🌿

सारथी महाराष्ट्राचा -नेवासा तालुका प्रतिनिधी
श्री. नाथाभाऊ शिंदे पाटील ९८२५०३३४२

RelatedPosts

मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत उरण तालुक्या मधून ग्रुप ग्रामपंचायत जासईचा द्वितीय क्रमांक.

कोल्हापूरात जावयाला दिली चांदीची चप्पल.धोंड्याच्या महिन्यात जावयाच्या थाट…

नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर आणि मुळा कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली. दोन्ही कारखान्यांविरोधातील सर्व गटातील सभासद पहिल्यांदाच एकत्र आल्याचे प्रतिपादन आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केले.
प्रस्थापित कारखान्यांच्या विरोधात उभे राहणारे सर्वजण आपले मित्र आहेत. यामध्ये पक्षभेद केला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आ. लंघे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात विरोधी सभासदांची पहिली संयुक्त बैठक गुरुवारी पार पडली. यावेळी भाजपा, शिवसेना, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि सभासद उपस्थित होते..

अनेक वर्षे ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक राहिलेले आ. लंघे पाटील आता विरोधी भूमिकेत असून त्यांच्यासोबत पंचगंगा शुगरचे सर्वेसर्वा प्रभाकरकाका शिंदे यांनीही दोन्ही निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीत प्रभाकर शिंदे यांनी दोन्ही कारखान्यांच्या विद्यमान व्यवस्थापनावर जोरदार टीका करत कोणत्याही परिस्थितीत निवडणुका बिनविरोध किंवा तडजोड होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. त्यांनी विद्यमान संचालक मंडळावर निशाणा साधला. तालुक्यातील दोन्ही कारखान्यांना ५४ ते ५५ वर्षांचा इतिहास असतानाही प्रत्येकी ५०० ते ६०० कोटी रुपयांचे कर्ज असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला.

आ. लंघे यांनी यावेळी सर्व विरोधी गटांनी मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले. बैठकीस शंकरराव लोखंडे, किसनराव गडाख, भारतीय किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश काळे, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, भाऊसाहेब वाघ, किरण जाधव, बी. डी. मोटे, दिनकरराव गर्जे, मेजर अरुण फाटके, रामभाऊ खंडागळे, हरीअप्पा तुवर, वाय. डी. कोल्हे, बाबासाहेब पिसोटे, शिवाजीराव मते, आशुतोष डहाळे, राजेंद्र मते, बाळासाहेब पवार, प्रताप चिंधे, आरले, सरपंच ललित मोटे, प्रमोद गजभार उपस्थित होते.

» ऊस नेण्याची गॅरंटी आमचीच

सभासदांचे ऊस नेण्याची गॅरंटी देतो. पंचगंगा कारखान्याप्रमाणे योग्य भाव देऊ. सर्व सभासदांना त्यांच्या मालाचे वजन करण्यास व त्याची पडताळणी करण्यास मुभा राहील. अडचणीच्या काळात कारखान्यांनी सभासदांना कायम त्रास दिला. त्यामुळे यावेळी निवडणुका झाल्याच पाहिजेत, असे स्पष्ट मत प्रभाकरराव (काका) शिंदे यांनी व्यक्त केले.

Tags: Natha Shinde
Previous Post

उजनी येथे बकरी ईद उत्साहात साजरी सामूहिक नमाज पठणानंतर सुख समृद्धीसाठी दुआ.

Next Post

कांदा उप्तादकांना लवकरच दिलासा: मिळणार

Related Posts

ताज्या घडामोडी

May 29, 2026
1
मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत उरण तालुक्या मधून ग्रुप ग्रामपंचायत जासईचा द्वितीय क्रमांक.
ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत उरण तालुक्या मधून ग्रुप ग्रामपंचायत जासईचा द्वितीय क्रमांक.

May 29, 2026
2
कोल्हापूरात जावयाला दिली चांदीची चप्पल.धोंड्याच्या महिन्यात जावयाच्या थाट…
ताज्या घडामोडी

कोल्हापूरात जावयाला दिली चांदीची चप्पल.धोंड्याच्या महिन्यात जावयाच्या थाट…

May 29, 2026
40
वालूज परिसरात ईद-उल-अजहा उत्साह, भक्ती आणि भाईचाऱ्याच्या वातावरणात साजरी
ताज्या घडामोडी

वालूज परिसरात ईद-उल-अजहा उत्साह, भक्ती आणि भाईचाऱ्याच्या वातावरणात साजरी

May 29, 2026
8
ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण कदम यांचे निधन
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण कदम यांचे निधन

May 29, 2026
7
अवैध दारू विक्रेत्यांविरोधात रणरागिणींचा एल्गार
ताज्या घडामोडी

अवैध दारू विक्रेत्यांविरोधात रणरागिणींचा एल्गार

May 29, 2026
6
Next Post
कांदा उप्तादकांना लवकरच दिलासा: मिळणार

कांदा उप्तादकांना लवकरच दिलासा: मिळणार

ताज्या बातम्या

May 29, 2026
मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत उरण तालुक्या मधून ग्रुप ग्रामपंचायत जासईचा द्वितीय क्रमांक.

मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत उरण तालुक्या मधून ग्रुप ग्रामपंचायत जासईचा द्वितीय क्रमांक.

May 29, 2026
कोल्हापूरात जावयाला दिली चांदीची चप्पल.धोंड्याच्या महिन्यात जावयाच्या थाट…

कोल्हापूरात जावयाला दिली चांदीची चप्पल.धोंड्याच्या महिन्यात जावयाच्या थाट…

May 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In