• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोगस खत विक्रीचा पाथरीत पर्दाफाश?; शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

Rudra by Rudra
May 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
बोगस खत विक्रीचा पाथरीत पर्दाफाश?; शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
0
SHARES
30
VIEWS
Ad 1
Ad 1

बोगस खत विक्रीचा पाथरीत पर्दाफाश?; शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
जिल्हा परिषद सदस्य अजिंक्य नखाते यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन; कृषी विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह .
पाथरी | प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

खरीप हंगामाच्या तोंडावर पाथरी तालुक्यात बोगस व अनधिकृत खतांची विक्री होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अजिंक्य नखाते यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शुक्रवार, दि. २९ मे रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात नखाते यांनी म्हटले आहे की, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मोठ्या

प्रमाणावर खते व बियाण्यांची खरेदी करत आहेत. अशा परिस्थितीत काही कृषी केंद्रांकडून बोगस, बनावट व अपमिश्रित खतांची विक्री केली जात असल्याची माहिती पुढे येत आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याबरोबरच पिकांच्या उत्पादनावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
निवेदनानुसार, छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी फर्टीलायझर कंपनीचे झिंक व बोरॉन दाणेदार उत्पादन हे सिंगल सुपर फॉस्फेट खत असल्याचे भासवून पाथरी येथील ज्ञानेश्वरी कृषी केंद्रामार्फत विक्री करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर करण्यात आलेल्या प्राथमिक शहानिशीत संबंधित कंपनी बोगस असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा नखाते यांनी केला आहे.

यासोबतच तालुक्यातील इतर कृषी केंद्रांमध्येही अशाच प्रकारच्या बोगस कंपन्यांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत का, याची व्यापक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने संपूर्ण तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबवून दोषी आढळणाऱ्या विक्रेते, वितरक व संबंधित कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकाराकडे कृषी विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही अधिकारी व संबंधित कंपन्यांमध्ये संगनमत अथवा लागेबांधे आहेत का, याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. बोगस खतांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
या निवेदनामुळे तालुक्यातील खत विक्री व्यवसाय आणि कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Tags: Ahamad Ansari
Previous Post

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा आधार..

Next Post

शिवसैनिकांच्या पाठीशी भक्कम उभा राहणार — विष्णूभाऊ मुरकुटे

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
शिवसैनिकांच्या पाठीशी भक्कम उभा राहणार — विष्णूभाऊ मुरकुटे

शिवसैनिकांच्या पाठीशी भक्कम उभा राहणार — विष्णूभाऊ मुरकुटे

ताज्या बातम्या

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In