• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चौराकुंड वन्यप्राणी मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी; खासदार बळवंत वानखडे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 2, 2026
in Blog
0
चौराकुंड वन्यप्राणी मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी; खासदार बळवंत वानखडे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

धारणी | प्रतिनिधी –

धारणी तालुक्यातील चौराकुंड येथे घडलेल्या वन्यप्राण्यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी अमरावतीचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

निवेदनानुसार, सुमारे आठ ते दहा दिवसांपूर्वी मेळघाटातील चौराकुंड जंगल परिसरात वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी विषारी पदार्थ टाकल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान वन विभाग व पोलिसांनी संशयाच्या आधारावर अनिल मुन्ना कास्देकर यांना ताब्यात घेतले. मात्र, ठोस पुरावे नसताना इतर ग्रामस्थांनाही संशयाच्या भोवऱ्यात ओढण्याचा प्रयत्न झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या तणावपूर्ण परिस्थितीत गावात अज्ञात व्यक्तीकडून झालेल्या दगडफेकीत एका महिला वन अधिकाऱ्याला दुखापत झाली. या घटनेचा निषेध करत दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी खासदार वानखडे यांनी केली आहे.

तसेच, दगडफेकीच्या घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काही आदिवासी कुटुंबांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांना घराबाहेर काढून चौकशी करण्यात येत असल्याचे आरोपही करण्यात आले आहेत.

या संपूर्ण प्रकरणात सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, तसेच निरपराध ग्रामस्थांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

निवेदन सादर करताना खासदार बळवंत वानखडे यांच्यासोबत रोहित पटेल उपस्थित होते.

Tags: Rajnish Sakle
Previous Post

ब्राम्हगाव येथील हनुमान मंदिरातील मूर्तीचा अवमान; घटनेचा निषेध, आरोपींचा शोध सुरू

Next Post

संघर्षातून यशाची गाथा; मुंबई पोलीसपदी निवड झालेल्या कुमार शुभम शिंदे यांचा सत्कार

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
5
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
46
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
10
Next Post
संघर्षातून यशाची गाथा; मुंबई पोलीसपदी निवड झालेल्या कुमार शुभम शिंदे यांचा सत्कार

संघर्षातून यशाची गाथा; मुंबई पोलीसपदी निवड झालेल्या कुमार शुभम शिंदे यांचा सत्कार

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In