• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेची बैठक संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 2, 2026
in Blog
0
उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेची बैठक संपन्न
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

धाराशिव, दि. २ जून : उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (दि. २ जून २०२६) दुपारी १२.३० वाजता के. टी. पाटील डी. फार्मसी कॉलेज येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अशोकराव मोहेकर होते. यावेळी खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष सुधीर पाटील, अशोकराव पवार, दत्ता बंडगर, धनंजय पाटील तसेच टिकले गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कार्यक्रमाचे प्रास्ताविक टिकले सर यांनी केले. त्यांनी शिक्षण संस्था चालविताना संस्थाचालकांसमोर उभ्या राहणाऱ्या विविध अडचणी, समस्या आणि आव्हानांचा आढावा घेतला. तसेच शासनस्तरावर आणि न्यायालयीन मार्गाने या समस्यांवर उपाययोजना करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

बैठकीत शिक्षण संस्थांसमोरील विविध प्रश्नांवर उपस्थित संस्थाचालकांनी आपली मते मांडली. यामध्ये सरवदे सर, पांडुरंग लाटे सर, शिंदे सर, मुळे मॅडम यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी आपल्या मनोगतात शिक्षक भरती प्रक्रियेतील पोर्टलमधील त्रुटी दूर करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. आवश्यकतेनुसार न्यायालयीन लढा उभारण्याची तयारीही संघटनेने दर्शविली.

शिपाई पदे रद्द करण्याचा तसेच सेवानिवृत्तीनंतर नवीन भरतीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांचा निषेध व्यक्त करताना, ही पदे संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी अत्यावश्यक असल्याने शासनाचा निर्णय न्यायालयात आव्हान देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

तसेच संस्थांमधील सेवानिवृत्त लिपिकांच्या जागी नवीन भरतीस असलेली बंदी उठवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असून, त्याबाबतही आवश्यक असल्यास न्यायालयीन याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संच मान्यता प्रक्रियेमधील विद्यार्थी संख्येच्या निकषांबाबत शासनाने घातलेल्या अन्यायकारक अटी व शर्ती, तसेच १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

याशिवाय, कनिष्ठ महाविद्यालयांच्या २०२५-२६ च्या ऑनलाईन संच मान्यता प्रक्रियेमध्ये विद्यार्थी संख्या, वर्कलोड, वेतनेतर अनुदान यांसारख्या बाबींमध्ये संस्थांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला. या संदर्भात संघटना न्यायालयीन लढा उभारणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

जिल्ह्यातील कायम शब्द काढलेल्या परंतु अद्याप मूल्यांकन न झालेल्या १२ प्राथमिक शाळांना स्वयंअर्थसहाय्यित करण्याचा अथवा बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. या शाळांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी संघटनेने दर्शविली.

बैठकीत शासनाच्या विविध धोरणांविरोधात टप्प्याटप्प्याने आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच धाराशिव येथे संघटनेचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला.

जिल्हास्तरीय शैक्षणिक प्रश्नांच्या न्यायालयीन लढ्यासाठी सात सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ही समिती विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करून संस्थांना आवश्यक कायदेशीर मदत उपलब्ध करून देणार आहे.

अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि मोठ्या संख्येने उपस्थित संस्थाचालकांच्या सहभागातून ही बैठक पार पडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव लहूराज लोमटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मार्गदर्शक ॲड. वसंतरावजी मडके यांनी केले.

Previous Post

भाजपमधील नाराजीचा फायदा महेश देशमुख यांना होणार का?

Next Post

चांभुर्डी येथील जि.प. शाळेत ब्रिटानिया डेअरी व सर नेस वाडिया फाउंडेशनतर्फे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प साकार

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
5
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
46
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
10
Next Post
चांभुर्डी येथील जि.प. शाळेत ब्रिटानिया डेअरी व सर नेस वाडिया फाउंडेशनतर्फे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प साकार

चांभुर्डी येथील जि.प. शाळेत ब्रिटानिया डेअरी व सर नेस वाडिया फाउंडेशनतर्फे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प साकार

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In