• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कॅनॉलकाठचे धोकादायक गोडबाभळीचे झाड तीन वर्षांपासून कायम; चंदन वृक्षतोड प्रकरणावरून प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 3, 2026
in Blog
0
कॅनॉलकाठचे धोकादायक गोडबाभळीचे झाड तीन वर्षांपासून कायम; चंदन वृक्षतोड प्रकरणावरून प्रशासनावर प्रश्नचिन्ह
0
SHARES
164
VIEWS
Ad 1

उंबरी बाळापूर (ता. संगमनेर) : उंबरी बाळापूर येथील प्रवरा डाव्या कॅनॉलच्या कडेला असलेले पडण्याच्या अवस्थेतील गोडबाभळीचे झाड हटविण्याबाबत गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप अर्जदार भागवत लिंबाजी खेमनर यांनी केला आहे. वारंवार पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊनही या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कॅनॉललगत असलेले हे झाड एका बाजूला मोठ्या प्रमाणात झुकले असून ते कधीही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, शेतकरी तसेच वाहतूक करणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून झाड हटविण्याची कार्यवाही केलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

दरम्यान, ज्या गोडबाभळीच्या झाडाबाबत तक्रारी करण्यात येत आहेत, त्याच परिसरातील चंदनाचे झाड काही व्यक्तींनी परवानगी न घेता तोडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेची माहिती संबंधित विभागांना देण्यात आली असतानाही कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नसल्याचा दावा अर्जदाराने केला आहे. तसेच काही विभागीय कर्मचाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करून हे प्रकरण दडपल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

याहूनही गंभीर बाब म्हणजे, ज्या व्यक्तींवर चंदन वृक्षतोडीचा आरोप आहे, त्याच व्यक्ती आता वन विभागाच्या अधिकाऱ्यांना झाड हटविण्याच्या कामात अडथळे निर्माण करत असल्याचे सांगितले जात आहे. काही वेळा आत्महत्येच्या धमक्या देऊन शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

जलसंधारण मंत्र्यांच्या जनता दरबारात मांडणार होते प्रश्न

अर्जदार भागवत खेमनर यांनी सांगितले की, सुमारे सहा महिन्यांपूर्वी राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे आयोजित केलेल्या जनता दरबारात हा विषय मांडण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही पाटबंधारे कर्मचाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन संबंधित झाड लवकरच काढण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे त्यांनी जनता दरबारात तक्रार मांडली नाही. परंतु त्यानंतरही आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

निष्पक्ष चौकशीची मागणी

धोकादायक गोडबाबळीचे झाड तातडीने हटवावे, चंदन वृक्षतोड प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भागवत लिंबाजी खेमनर यांनी प्रशासनाकडे केली आहे. या प्रकरणामुळे संबंधित विभागांच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Previous Post

शिक्षणाला प्रोत्साहन; नगराध्यक्ष फरीन बेगम यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Next Post

घोलप वस्ती ते पोलीस पाटील वस्ती रस्ता मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन उत्साहात

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
घोलप वस्ती ते पोलीस पाटील वस्ती रस्ता मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन उत्साहात

घोलप वस्ती ते पोलीस पाटील वस्ती रस्ता मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन उत्साहात

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In