• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जलस्रोत बळकटीकरणासाठी व्यापक उपाययोजना करा ; पाण्याचा अपव्यय टाळासंभाव्य अल निनो व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
जलस्रोत बळकटीकरणासाठी व्यापक उपाययोजना करा ; पाण्याचा अपव्यय टाळासंभाव्य अल निनो व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

धाराशिव,दि.२ जून (जिमाका) संभाव्य अल निनो परिस्थितीमुळे उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करण्यासाठी सार्वजनिक व खासगी विहिरी, हातपंप तसेच रिचार्ज शाफ्ट परिसरात मोठ्या प्रमाणावर भूगर्भात पाणीसंचयन होईल अशा पद्धतीने ‘जलतारा खड्डे’ तयार करावेत.तसेच सार्वजनिक इमारतींवरून पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी भूजल पुनर्भरणासारखे उपक्रम राबवून जलस्रोत बळकट करावेत.पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करून त्याचा अपव्यय टाळावा,असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.

जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी आज मंगळवारी (दि.२ जून) त्यांच्या दालनातून संभाव्य अल निनो आणि चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई व चारा उपलब्धतेबाबत आयोजित आढावा बैठकीत हे निर्देश दिले.

RelatedPosts

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची किशोर पवार यांच्याशी सदिच्छा भेट

उमरगा-लोहारा लवकरच दोन आमदारांचा भाग होणार; पण प्रश्न तेच राहणार का.

निर्भय, नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होईल याची दक्षता घ्या – निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात,नगरपालिका प्रशासन विभागाचे जिल्हा सहआयुक्त त्र्यंबक ढेंगळे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ.डी.एम.मुळे,भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ वैज्ञानिक आर.व्ही.मांजरमकर, धाराशिव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एन.मदने,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एम.कटकधोंड,मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी,धाराशिव पाटबंधारे विभाग क्रमांक दोन (उमरगा) चे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे,धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे,जिल्हा परिषद यांत्रिकी विभागाचे उपअभियंता एस.पी.शिंदे उपस्थित होते.तसेच सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की,पुढील वर्षीही भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.त्यामुळे आतापासूनच सूक्ष्म नियोजन करून भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. मोठ्या प्रकल्पांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे.सिंचन प्रकल्प परिसरातील गावांमध्ये पाण्याची पातळी समाधानकारक असल्यास विनाकारण विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित करू नयेत.तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून ज्या विहिरी पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत,त्यांची प्रत्यक्ष गरज तपासावी.

ग्रामपंचायतींनी स्वतःचे जलस्रोत सक्षम करण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. तसेच सिंचन प्रकल्पांतील पाणी परिसरातील गावांच्या पिण्याच्या गरजांसाठी अधिग्रहित करण्याची कार्यवाही करावी,असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी ‘जलतारा खड्डे’ हा उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविण्याचे निर्देश देत श्री.पुजार म्हणाले की,सुधारित टंचाई निवारण आराखडा तयार करण्यात यावा. विहिरींमधील गाळ काढणे,त्यांची दुरुस्ती तसेच हातपंप दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत.शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील विहिरींजवळ व शेतात जलतारा खड्डे तयार करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

सार्वजनिक आणि खासगी इमारतींवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संचयन करण्यासाठी भूजल पुनर्भरणाची कामे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी पुढाकार घेऊन करावीत.पाणीपुरवठा योजनांमधील गळती तातडीने थांबवावी. तसेच सिमेंटच्या पोत्यांत रेती भरून नदी-नाल्यांतील वाहते पाणी अडवून त्याची भूगर्भात साठवण करण्यासाठी ग्रामस्थांनी श्रमदानातून पुढाकार घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले.

निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनीही पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी अधिग्रहित केलेल्या विहिरींची तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी तसेच शेतकऱ्यांना जलतारा खड्डे तयार करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे सांगितले.

बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एम.कटकधोंड यांनी माहिती दिली की,सध्या धाराशिव तालुक्यातील सात गावांना ११ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून ५२ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.तुळजापूर तालुक्यात नऊ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.भूम तालुक्यातील दहा गावांसाठी २२ विहिरी तसेच चार गावांसाठी पाच खासगी टँकर कार्यरत आहेत.याशिवाय १५ गावांसाठी १६ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात एकूण ११ गावांना १६ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून ६५ गावांसाठी ९९ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात यांनी सांगितले की,धाराशिव पाटबंधारे विभाग क्रमांक एक व दोन अंतर्गत एकूण २२६ प्रकल्प आहेत.त्यामध्ये एक मोठा,१७ मध्यम आणि २०८ लघु प्रकल्पांचा समावेश आहे.या सर्व प्रकल्पांमध्ये ७२८.८० दलघमी उपयुक्त पाणीसाठा क्षमता असून २९ मे २०२६ अखेर १२०.७४२ दलघमी म्हणजेच १६.५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ.डी.एम.मुळे यांनी सांगितले की, जिल्ह्यात ७ लाख ९० हजार ३९९ इतके पशुधन असून त्यासाठी दररोज ३ हजार ८९ मे.टन वैरण आवश्यक आहे. उपलब्ध व संभाव्य वैरण साठा ४ लाख ६३ हजार ३५० मे.टन असून तो ऑक्टोबर २०२६ पर्यंत पुरेल इतका आहे.

वैरण विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून ५० हजार किलो संकरित मका बियाण्यांचे वितरण करण्यात आले असून त्यातून सुमारे २ लाख ५० हजार मे.टन चारा उत्पादन अपेक्षित आहे.तसेच विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत ५,२२० किलो संकरित मका बियाणे ५२२ पशुपालक शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले असून त्यातून २६ हजार १०० मे. टन चारा उत्पादन अपेक्षित आहे.

एकूण ५५ हजार २२० किलो संकरित मका बियाणे १३ हजार २२ पशुपालकांना वितरित करण्यात आले असून त्याची लागवड १३ हजार ८०५ एकर क्षेत्रावर करण्यात येत आहे.यामधून सुमारे २ लाख ७६ हजार १०० मे.टन चारा उत्पादन होण्याची अपेक्षा असल्याची माहिती डॉ.मुळे यांनी दिली.

बैठकीत ऑनलाइन सहभागी झालेल्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना व कामांचा आढावाही सादर केला

Previous Post

‘स्टॉफ इंडिया पारगड हेरिटेज रन’ची तयारी पूर्ण; ७ जूनला ३ हजार धावपटू धावणार

Next Post

धाराशिवमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा धडक छापा; पाच महिलांची सुटका

Related Posts

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची किशोर पवार यांच्याशी सदिच्छा भेट
Blog

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची किशोर पवार यांच्याशी सदिच्छा भेट

June 4, 2026
2
उमरगा-लोहारा लवकरच दोन आमदारांचा भाग होणार; पण प्रश्न तेच राहणार का.
Blog

उमरगा-लोहारा लवकरच दोन आमदारांचा भाग होणार; पण प्रश्न तेच राहणार का.

June 4, 2026
4
निर्भय, नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होईल याची दक्षता घ्या – निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर
Blog

निर्भय, नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होईल याची दक्षता घ्या – निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर

June 4, 2026
1

7
आजरा : विद्यावर्धिनी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड
Blog

आजरा : विद्यावर्धिनी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड

June 4, 2026
13
Next Post
धाराशिवमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा धडक छापा; पाच महिलांची सुटका

धाराशिवमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा धडक छापा; पाच महिलांची सुटका

ताज्या बातम्या

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची किशोर पवार यांच्याशी सदिच्छा भेट

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची किशोर पवार यांच्याशी सदिच्छा भेट

June 4, 2026
उमरगा-लोहारा लवकरच दोन आमदारांचा भाग होणार; पण प्रश्न तेच राहणार का.

उमरगा-लोहारा लवकरच दोन आमदारांचा भाग होणार; पण प्रश्न तेच राहणार का.

June 4, 2026
निर्भय, नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होईल याची दक्षता घ्या – निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर

निर्भय, नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होईल याची दक्षता घ्या – निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर

June 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In