• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धाराशिवमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा धडक छापा; पाच महिलांची सुटका

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
धाराशिवमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा धडक छापा; पाच महिलांची सुटका
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

धाराशिव | प्रतिनिधी

धाराशिव शहरातील एका स्पा सेंटरच्या आडून सुरू असलेल्या कथित अनैतिक देहव्यापारावर पोलिसांनी धडक कारवाई करत पाच महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी संबंधित व्यवस्थापक, चालक आणि इतर आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

पोलीस अधीक्षक रीतु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील ओरा (Aura) स्पा सेंटर येथे दि. २ जून २०२६ रोजी छापा टाकण्यात आला.

पंटरच्या माध्यमातून माहितीची खातरजमा

स्पा सेंटरमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी प्रथम पंटरच्या माध्यमातून माहितीची खातरजमा केली. त्यानंतर शासकीय पंचांच्या उपस्थितीत नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली. छाप्यादरम्यान स्पा सेंटरमध्ये अनैतिक व्यापार सुरू असल्याचे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पाच महिलांची सुटका

कारवाईदरम्यान पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली. संबंधित महिलांना पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि पुनर्वसनासाठी संबंधित प्राधिकरणाकडे पाठविण्यात आले आहे. तसेच या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या व्यवस्थापक, चालक आणि इतर संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

विशेष पथकाचा सहभाग

या कारवाईत परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते, पोलीस निरीक्षक एम. एन. शेळके (AHTU), पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के, तसेच पोलीस अंमलदार माने, दूधभाते, कंदळे, नाईकवडी, किवंडे, केवके आणि महिला पोलीस हवालदार पुरी, जाधव यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम

धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बेकायदेशीर आणि अनैतिक व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून या मोहिमेची विशेष जबाबदारी पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक रीतु खोखर यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अवैध व्यवसाय, अनैतिक कृत्ये आणि बेकायदेशीर धंद्यांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

या कारवाईमुळे धाराशिव शहरात खळबळ उडाली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

जलस्रोत बळकटीकरणासाठी व्यापक उपाययोजना करा ; पाण्याचा अपव्यय टाळासंभाव्य अल निनो व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Next Post

निर्भय, नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होईल याची दक्षता घ्या – निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
169
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
33
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
44
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
11
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
92
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
18
Next Post
निर्भय, नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होईल याची दक्षता घ्या – निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर

निर्भय, नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होईल याची दक्षता घ्या – निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In