• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निर्भय, नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होईल याची दक्षता घ्या – निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
निर्भय, नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होईल याची दक्षता घ्या – निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

धाराशिव, दि. ३ जून

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक विधान परिषद निवडणूक २०२६ साठी येत्या १८ जून रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करून ही निवडणूक निर्भय, नि:पक्षपणे आणि मुक्त वातावरणात पार पडेल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर यांनी दिले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बुधवारी (दि. ३) आयोजित निवडणूक तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी कीर्ती किरण पुजार, प्रियंवदा म्हाडदळकर, रीतु खोखर, ज्योती पाटील, नीलेश काळे, विद्याचरण कडवकर, शिरीष यादव, प्रवीण धरमकर, संतोष राऊत, स्वाती शेंडे, अरुणा गायकवाड, ओंकार देशमुख, हर्षल डाके, विवेक खडसे, डॉ. मृणाल जाधव आणि अमोघ भुजबळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच लातूर व बीड जिल्ह्यातील अधिकारी ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले.

बैठकीत मार्गदर्शन करताना मिलिंद बोरकर यांनी सांगितले की, राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी या निवडणुकीत सूक्ष्म निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. मतदान साहित्य वितरण व स्वीकृती केंद्राचे काम योग्य पद्धतीने पार पाडावे. मतपेट्या सुरक्षितपणे मतदान केंद्रावर पोहोचविणे तसेच मतदानानंतर सीलबंद मतपेट्यांची वाहतूक कडक सुरक्षा व्यवस्थेत करावी. या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, याची विशेष काळजी घ्यावी.

मतदान प्रक्रियेची माहिती वेळोवेळी संकलित करावी तसेच मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प आणि व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेऊन आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी. प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे नि:पक्षपाती राहील याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी मतदान पथकांना सर्व टप्प्यांतील प्रशिक्षण परिपूर्णपणे देण्याच्या सूचना केल्या. तसेच आचारसंहिता भंग होणार नाही यासाठी सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव यांनी निवडणुकीची माहिती देताना सांगितले की, या निवडणुकीत जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींचे मिळून एकूण ९८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बीड जिल्हा परिषदेची निवडणूक अद्याप झालेली नसल्यामुळे त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य मतदार यादीत समाविष्ट नसल्याची माहिती त्यांनी दिली.

बैठकीस लातूर आणि बीड जिल्ह्यांतील निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते.

Previous Post

धाराशिवमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा धडक छापा; पाच महिलांची सुटका

Next Post

उमरगा-लोहारा लवकरच दोन आमदारांचा भाग होणार; पण प्रश्न तेच राहणार का.

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
उमरगा-लोहारा लवकरच दोन आमदारांचा भाग होणार; पण प्रश्न तेच राहणार का.

उमरगा-लोहारा लवकरच दोन आमदारांचा भाग होणार; पण प्रश्न तेच राहणार का.

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In