• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देशी कट्टे बनविणाऱ्या आरोपीला बेड्या; शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
देशी कट्टे बनविणाऱ्या आरोपीला बेड्या; शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

अकोला | प्रतिनिधी

अवैध शस्त्रनिर्मिती आणि शस्त्र तस्करीविरोधात राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत दहीहंडा पोलिसांनी मोठी कारवाई करत देशी कट्टे तयार करणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले असून आरोपीला हरियाणातील कारागृहातून ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

स्थानिक गुन्हे शाखेला ३० एप्रिल रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दत्ता मोहोड आणि अक्षय मोहोड यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून एक देशी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. पुढील तपासादरम्यान शेख अकबर शेख हारून याच्याकडून आणखी एक गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले.

या कारवाईत पोलिसांनी दोन गावठी पिस्तुले, दोन जिवंत काडतुसे, मोटारसायकल आणि मोबाईल फोन असा सुमारे २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दहीहंडा पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्टन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान किस्मतसिंग तकदीरसिंग (रा. पाचोरी, जि. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) याचे नाव समोर आले. मोबाईल क्रमांकांच्या तांत्रिक विश्लेषणातून संबंधित आरोपी हा हरियाणातील पालवल जिल्ह्यातील हठीन पोलीस ठाण्यातील आर्म्स अॅक्टच्या एका प्रकरणात अटक होऊन फरीदाबाद येथील निमका कारागृहात न्यायालयीन कोठडीत असल्याचे निष्पन्न झाले.

दहीहंडा पोलिसांनी ३० मे रोजी आरोपीला कारागृहातून ताब्यात घेऊन न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळवली. चौकशीदरम्यान आरोपीने स्वतः देशी कट्टे तयार करत असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी मध्यप्रदेशातील त्याच्या राहत्या घरावर छापा टाकून ग्राइंडर मशीन, लोखंडी कानस, करवत, छन्नी, हातोडी, सांडशी यांसह शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले.

या कारवाईमुळे अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उघडकीस आले असून या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मध्यप्रदेशातून जप्त करण्यात आलेल्या साहित्याबाबत पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अर्चित चांडक, बी. चंद्रकांत रेड्डी तसेच निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल ढोले यांच्या नेतृत्वात पार पडली.

कारवाईत हेड कॉन्स्टेबल सागर कापसे, पीएसआय सोपान डाभेराव, पोलीस हवालदार रवी डाभेराव, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप राऊत, माधव कोरे, सन्नी वाकोडे, विजय वागतकर आणि नवनाथ कोकाटे यांनी सहभाग घेतला.

अवैध शस्त्र व्यवहाराविरोधातील या धडक कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

Previous Post

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची किशोर पवार यांच्याशी सदिच्छा भेट

Next Post

खंडाळ्यात मुलाकडून वडिलांचा खून; आरोपी पुत्र पोलिसांच्या ताब्यात

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
खंडाळ्यात मुलाकडून वडिलांचा खून; आरोपी पुत्र पोलिसांच्या ताब्यात

खंडाळ्यात मुलाकडून वडिलांचा खून; आरोपी पुत्र पोलिसांच्या ताब्यात

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In