• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मार्डा डॅम परिसरात अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला; पोलिसांकडून तपास सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 6, 2026
in Blog
0
मार्डा डॅम परिसरात अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला; पोलिसांकडून तपास सुरू
0
SHARES
48
VIEWS
Ad 1

मारेगाव | प्रतिनिधी :

मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मार्डा डॅम परिसरात एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथे पाठविण्यात आला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत युवकाने लाल रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. मृतदेहाची अवस्था पाहता मृत्यू होऊन किमान तीन ते चार दिवस उलटले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चेहरा पूर्णपणे ओळखू न येण्याच्या स्थितीत असल्याने मृताची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत.

या प्रकरणात मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हा नैसर्गिक मृत्यू आहे की घातपात, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. संबंधित युवकाचा मृत्यू घटनास्थळीच झाला की अन्यत्र घडलेल्या घटनेनंतर मृतदेह येथे आणून टाकण्यात आला, याचाही तपास पोलीस करीत आहेत.

घटनास्थळावरील परिस्थिती आणि मृतदेहाची अवस्था यामुळे परिसरात चर्चांना उधाण आले असून पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शाम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस पथक करीत आहे. मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक प्रयत्न सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Previous Post

लोप पावत चाललेल्या नंदीबैल कलेचे दर्शन; चिचोंडी पाटीलमध्ये परंपरेला उजाळा

Next Post

पसायदान गृहाची दुरवस्था; नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
5
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
46
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
10
Next Post
पसायदान गृहाची दुरवस्था; नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त

पसायदान गृहाची दुरवस्था; नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In