• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पसायदान गृहाची दुरवस्था; नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 6, 2026
in Blog
0
पसायदान गृहाची दुरवस्था; नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

मारेगाव | प्रतिनिधी

मारेगाव शहरातील प्रमुख मार्केट लाईन परिसरात तसेच पोलीस स्टेशनलगत नगरपंचायतीमार्फत उभारण्यात आलेल्या पसायदान गृहाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या सार्वजनिक सुविधेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

तालुक्यातील विविध गावांमधून नागरिक बँक, तहसील कार्यालय, पंचायत समिती आदी शासकीय कामांसाठी मारेगाव येथे येत असतात. अशा नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने नगरपंचायतीने पसायदान गृहाची उभारणी केली होती. मात्र सध्या या ठिकाणी अस्वच्छता, तुटफूट आणि देखभालीचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे.

पसायदान गृहातील स्वच्छतागृहांच्या दरवाजांना मोठी भगदाडे पडली असून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काही ठिकाणी मद्यपान करून टाकलेल्या रिकाम्या बाटल्याही आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांना या सुविधेचा वापर करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नगरपंचायतीकडे कराच्या स्वरूपात लाखो रुपयांचा महसूल जमा होत असताना सार्वजनिक सुविधांच्या देखभालीकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक मालमत्तेची योग्य देखभाल करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने तातडीने दखल घेऊन पसायदान गृहाची स्वच्छता, दुरुस्ती आणि सुरक्षा व्यवस्था सुधारावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. सार्वजनिक सुविधांचा दर्जा राखण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

मार्डा डॅम परिसरात अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला; पोलिसांकडून तपास सुरू

Next Post

समाज जागृती मंच, दोडामार्गतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
5
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
46
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
10
Next Post

समाज जागृती मंच, दोडामार्गतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In