• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिक्षण हक्कासाठी रयत शेतकरी संघटनेचा एल्गार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 6, 2026
in Blog
0
शिक्षण हक्कासाठी रयत शेतकरी संघटनेचा एल्गार
0
SHARES
339
VIEWS
Ad 1

मोफत शिक्षण, शिक्षक भरती आणि ग्रामीण शाळा वाचवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लातूर | प्रतिनिधी

राज्यातील गरीब, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाढत्या खर्चाचा मोठा फटका बसत असल्याने “सर्वांसाठी समान आणि संपूर्ण मोफत शिक्षण” लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी रयत शेतकरी संघटना, महाराष्ट्र आक्रमक झाली आहे. संघटनेच्या वतीने लातूर जिल्हाधिकाऱ्यांना विविध शैक्षणिक मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

संघटनेने जिल्हा परिषद शाळांपासून उच्च शिक्षणापर्यंत “झिरो फी एज्युकेशन” धोरण तात्काळ लागू करण्याची मागणी केली आहे. वाढती शैक्षणिक फी, विविध प्रकारचे शुल्क, शिक्षणाचे खासगीकरण आणि अपुऱ्या सुविधा यांमुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील ५० हजारांहून अधिक रिक्त शिक्षक पदांसाठी तातडीने पारदर्शक मेगा भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच ग्रामीण भागातील शाळा बंद करण्याचे अथवा खासगी संस्थांच्या ताब्यात देण्याचे प्रयत्न त्वरित थांबवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

प्रत्येक ग्रामीण शाळेत डिजिटल शिक्षण सुविधा, हाय-स्पीड इंटरनेट, सुसज्ज प्रयोगशाळा, टॅबलेट्स आणि आधुनिक ग्रंथालये उपलब्ध करून देण्यासाठी विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद न करता त्यांचे बळकटीकरण करण्यावर भर देण्याची आवश्यकता संघटनेने व्यक्त केली.

दरम्यान, शासनाने १५ जून २०२६ पर्यंत सकारात्मक निर्णय न घेतल्यास १५ जुलै २०२६ रोजी उदगीर तहसील कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा संघटनेने केली आहे. पुढील टप्प्यात मोर्चे, मंत्रालय घेराव, शाळा बंद आंदोलन आणि राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

“शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये,” अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली.

हे निवेदन रयत शेतकरी संघटनेचे उदगीर तालुका अध्यक्ष केद्रे प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. संघटनेच्या या भूमिकेमुळे शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांकडे पुन्हा एकदा राज्याचे लक्ष वेधले गेले आहे.

Previous Post

महावितरणच्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात

Next Post

मनपा शाळा क्रमांक ४९, पंचक येथील जॉगिंग ट्रॅक व ग्रीन जिमची दुरवस्था; नागरिकांचा संताप

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
मनपा शाळा क्रमांक ४९, पंचक येथील जॉगिंग ट्रॅक व ग्रीन जिमची दुरवस्था; नागरिकांचा संताप

मनपा शाळा क्रमांक ४९, पंचक येथील जॉगिंग ट्रॅक व ग्रीन जिमची दुरवस्था; नागरिकांचा संताप

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In