• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आ. चंद्रकांत रघुवंशी यांना कॅबिनेट मंत्रीपद द्या; नंदुरबार जिल्हावासीयांची खा. श्रीकांत शिंदे यांच्याकडे मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 6, 2026
in Blog
0
आ. चंद्रकांत रघुवंशी यांना कॅबिनेट मंत्रीपद द्या; नंदुरबार जिल्हावासीयांची खा. श्रीकांत शिंदे यांच्याकडे मागणी
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

शहादा, दि. ६ | प्रतिनिधी

शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना आगामी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे, अशी आग्रही मागणी शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

तळोदा येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसंवाद दौऱ्यादरम्यान शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्यासह शहादा परिसरातील नागरिकांनी खा. श्रीकांत शिंदे यांना निवेदन सादर करून ही मागणी केली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नंदुरबार जिल्हा हा दुर्गम व विकासाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसा वंचित राहिलेला जिल्हा असून रोजगार, सिंचन आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना मंत्रिमंडळात संधी दिल्यास जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

निवेदनानुसार, संयुक्त धुळे-नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करताना रघुवंशी यांनी दुर्गम भागांमध्ये विकासकामे पोहोचवली. तसेच नंदुरबार नगरपालिकेत विकासाचा नवा आदर्श निर्माण केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. साक्री आणि अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेचे आमदार निवडून आणण्यातही त्यांच्या रणनीतीचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे नमूद करण्यात आले.

विधान परिषदेत त्यांनी शोषित, वंचित आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविल्याचे सांगत, आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नंदुरबार जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा कायापालट करण्यासाठी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा, अशी भावना जिल्हावासीयांनी व्यक्त केली आहे.

निवेदन स्वीकारताना खा. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत दादाजी भुसे, आनंद परांजपे, भाऊसाहेब चौधरी, राजेंद्र गावित, शिरीष चौधरी, आमश्या पाडवी आणि अविष्कार भुसे उपस्थित होते.

या निवेदनाची प्रत योग्य त्या कार्यवाहीसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडेही पाठविण्यात आली आहे.

या निवेदनावर शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल, शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे, डॉ. राजेंद्र पेंढारकर, जयसिंग ठाकरे, लक्ष्मण पवार, एकनाथ ठाकरे, किरण खर्डे, छायाबाई भामरे, प्रियांका ठाकरे यांच्यासह शहादा परिसरातील अनेक कार्यकर्ते व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Previous Post

शहरातील वाढत्या अतिक्रमणाविरोधात उपनगराध्यक्षा आक्रमक; मुख्याधिकाऱ्यांना स्मरणपत्र

Next Post

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
5
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
46
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
10
Next Post
शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In