• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 6, 2026
in Blog
0
शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

शहादा, दि. ५ | प्रतिनिधी

निसर्ग संवर्धन आणि वृक्षांचे संगोपन हा मानवी अस्तित्वाचा मूलभूत आधार असल्याचा संदेश देत पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पटेल, उपप्राचार्य प्रा. कल्पना पटेल तसेच पर्यवेक्षक के. एच. नागेश यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यासोबतच यापूर्वी लावण्यात आलेल्या वृक्षांची पाहणी करून त्यांच्या वाढीचा आढावा घेण्यात आला. गतवर्षी लावलेल्या वृक्षांचे योग्य संगोपन झाल्याचे पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “वाढते प्रदूषण आणि हवामान बदल ही आजच्या काळातील गंभीर आव्हाने आहेत. निसर्गाचे संवर्धन आणि संगोपन केल्याशिवाय मानवी अस्तित्व सुरक्षित राहू शकत नाही. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला पाहिजे.”

या कार्यक्रमास वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. डी. सिंदखेडकर, ज्येष्ठ प्राध्यापक विजय डोळे, प्रा. शिवनाथ पटेल, प्रा. भारती पाटील आणि प्रा. चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रम अधिकारी प्रा. उर्मिला पावरा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय विसावे, रईस शेख, दिलवर ठाकरे आणि राहुल बागले यांनी विशेष परिश्रम घेतले.

“वृक्ष लावा, वृक्ष जगवा – पर्यावरणाचे रक्षण करा” या संदेशाचा सामूहिक जयघोष करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महाविद्यालयाच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Previous Post

आ. चंद्रकांत रघुवंशी यांना कॅबिनेट मंत्रीपद द्या; नंदुरबार जिल्हावासीयांची खा. श्रीकांत शिंदे यांच्याकडे मागणी

Next Post

कुमार भवन शेणगाव येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा; देशी वृक्षांचे वृक्षारोपण

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
5
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
46
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
10
Next Post
कुमार भवन शेणगाव येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा; देशी वृक्षांचे वृक्षारोपण

कुमार भवन शेणगाव येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा; देशी वृक्षांचे वृक्षारोपण

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In