• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुमार भवन शेणगाव येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा; देशी वृक्षांचे वृक्षारोपण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 6, 2026
in Blog
0
कुमार भवन शेणगाव येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा; देशी वृक्षांचे वृक्षारोपण
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

शेणगाव | प्रतिनिधी

श्री मौनी विद्यापीठ संचलित कुमार भवन, शेणगाव येथे ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभाग आणि हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध देशी वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

यावेळी चिंच, करंज, उंबर, जांभूळ आणि कडुलिंब यांसारख्या देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमात सामाजिक वनीकरण विभागाचे रेन फॉरेस्ट ऑफिसर श्री खेतलसो यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच प्रशालेत राबविण्यात येणाऱ्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती घेऊन त्यांनी संस्थेचे कौतुक केले.

प्रशालेत सीडबॉल तयार करणे, दरवर्षी वृक्षलागवड करणे, वनराई बंधारे उभारणे, ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या मातांना वृक्ष वाटप करणे तसेच प्लास्टिकमुक्तीबाबत जनजागृती करणे असे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला कुमार भवनचे मुख्याध्यापक अनिल कामत, सौ. शिंदे मॅडम, येरुडकर मॅडम, सावर्दे मॅडम, कांबळे मॅडम, श्री पाटील, हरित सेना विभाग प्रमुख शरद पाटील, कोतमिरे मॅडम, पी. एम. मेंगाणे तसेच इयत्ता दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.

याशिवाय अंगणवाडी सेविका शुभांगी हावळ, वंदना जाधव, वैजयंती खराडे, कविता कुरणे, रंजना कुंभार, कविता पवार, सुनिता चेटके आणि पूजा सणगर यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जीवन शिक्षण मंदिर, शेणगावचे मुख्याध्यापक राजू शिंदे व शिंदे मॅडम यांचे सहकार्य लाभले.

वृक्षारोपणासह पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी केला. “वृक्ष लावा, वृक्ष जगवा” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Post

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

Next Post

फोटो काढण्यापुरती झाडं लावू नका; ती मुलासारखी जगवून दाखवा : वृषाल आण्णा हुक्केरी यांचा पर्यावरण दिनी मोलाचा संदेश

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
5
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
46
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
10
Next Post
फोटो काढण्यापुरती झाडं लावू नका; ती मुलासारखी जगवून दाखवा : वृषाल आण्णा हुक्केरी यांचा पर्यावरण दिनी मोलाचा संदेश

फोटो काढण्यापुरती झाडं लावू नका; ती मुलासारखी जगवून दाखवा : वृषाल आण्णा हुक्केरी यांचा पर्यावरण दिनी मोलाचा संदेश

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In