• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अवकाळी पाऊस व ‘तेल्या’ रोगामुळे डाळिंब बागा उद्ध्वस्त; हंगेवाडीतील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
अवकाळी पाऊस व ‘तेल्या’ रोगामुळे डाळिंब बागा उद्ध्वस्त; हंगेवाडीतील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
0
SHARES
59
VIEWS
Ad 1

श्रीगोंदे / प्रतिनिधी

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. वाढत्या तापमानामुळे डाळिंब पिकावर ‘तेल्या’ रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून अनेक बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या आहेत. श्रीगोंदे तालुक्यातील हंगेवाडी परिसरातही या संकटाचा फटका बसला असून शेतकऱ्यांना आपल्या बागांवर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

हंगेवाडी येथील तरुण शेतकरी तुषार नवले आणि विशाल नवले यांनी मोठ्या मेहनतीने उभी केलेली डाळिंब बाग वादळी वाऱ्यामुळे आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे. या नुकसानीमुळे त्यांचे तब्बल १० लाख रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शासनाने तातडीने नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

डाळिंब पिकावर ‘तेल्या’ रोगाचा वाढता प्रादुर्भाव शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. रोग नियंत्रणासाठी विविध औषधांची फवारणी करूनही अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपये खर्चूनही नुकसान टळलेले नाही. परिणामी काही शेतकऱ्यांनी संपूर्ण बागाच काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी डाळिंबाची झाडे उन्मळून पडली असून फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळांची गुणवत्ता खालावल्याने बाजारभावावरही परिणाम होत आहे. उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून अनेकांना कर्जाचा सामना करावा लागत आहे.

बागा वाचवण्यासाठी काही शेतकरी शेडनेटसारख्या अतिरिक्त उपाययोजनांचा अवलंब करत असले तरी त्यासाठीही मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवरील आर्थिक भार अधिक वाढला आहे.

दरम्यान, बाधित डाळिंब बागांचे तातडीने पंचनामे करून शासनाने योग्य नुकसान भरपाई द्यावी, तसेच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Tags: Sikandar Tamboli
Previous Post

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सुधाकर माणगांकर यांची नियुक्ती

Next Post

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; आडस येथे विचारांना अभिवादन

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
12
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
10
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
4
Next Post
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; आडस येथे विचारांना अभिवादन

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; आडस येथे विचारांना अभिवादन

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In