माळशिरस | प्रतिनिधी
ओंकार साखर कारखाना प्रा.लि., चांदापुरी युनिट नं. ०१ येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. ओंकार उद्योग समूहाचे चेअरमन तथा अशोक नागरी सहकारी बँकेचे मार्गदर्शक श्री. बाबुराव बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
तसेच ओंकार उद्योग समूहाचे संचालक श्री. ओमराजे बोत्रे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तही या कार्यक्रमाचे विशेष औचित्य साधण्यात आले. कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री. वाघमोडे साहेब आणि डिस्टलरी मॅनेजर श्री. पाटील साहेब यांच्या शुभहस्ते कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनेतून चेअरमन श्री. बाबुराव बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. “झाडे लावा, झाडे जगवा” तसेच “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” हा संदेश देत हरित पर्यावरणासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे यावेळी आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख तसेच मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.








