• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली १.२३ कोटींची सायबर फसवणूक; दिल्लीतील आरोपी रत्नागिरी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 8, 2026
in Blog
0
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली १.२३ कोटींची सायबर फसवणूक; दिल्लीतील आरोपी रत्नागिरी सायबर पोलिसांच्या जाळ्यात
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

रत्नागिरी | प्रतिनिधी

बेंगळुरू पोलीस व सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत तब्बल ₹१ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिल्लीतील एका आरोपीला रत्नागिरी सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांना संपर्क साधून त्यांच्या कॅनरा बँक, माटुंगा (मुंबई) येथील खात्यातून सुमारे ₹३ कोटी रुपयांचा संशयित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा बनाव रचला. त्यानंतर त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आल्याची भीती दाखवून चौकशीच्या नावाखाली वारंवार पैसे भरण्यास भाग पाडले.

दि. ४ नोव्हेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत फिर्यादींकडून विविध व्यवहारांद्वारे एकूण ₹१,२३,००,००० इतकी रक्कम उकळण्यात आली.

तक्रारीनंतर रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०२/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(२), ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत दिल्ली–नोएडा येथून आरोपी गगनदीप भारद्वाज याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात प्रभारी अधिकारी स्मिता सुतार, सहायक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, पोलीस हवालदार संदीप नाईक व पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Previous Post

आडगाव ग्रामपंचायतीवरील आरोप फेटाळले; सरपंचांकडून कागदोपत्री पुरावे सादर, चौकशीला तयारी

Next Post

पहिल्याच पावसात मजगावात गटारे तुंबली; नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
पहिल्याच पावसात मजगावात गटारे तुंबली; नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

पहिल्याच पावसात मजगावात गटारे तुंबली; नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In