• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आकाशवाणीवरून घडणार गणपतीपुळेची मनमोहक सफर; ‘कोकण दर्शन’मध्ये सागरी पर्यटनाचा विशेष प्रवास

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 9, 2026
in Blog
0
आकाशवाणीवरून घडणार गणपतीपुळेची मनमोहक सफर; ‘कोकण दर्शन’मध्ये सागरी पर्यटनाचा विशेष प्रवास
0
SHARES
36
VIEWS
Ad 1

रत्नागिरी | प्रतिनिधी

आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या लोकप्रिय ‘कोकण दर्शन’ या कार्यक्रमातून यावेळी कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे आणि तेथील सागरी पर्यटनाची विशेष सफर श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. हा विशेष कार्यक्रम १२ जून रोजी सकाळी ८.४० वाजता प्रसारित होणार आहे.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

‘कोकण दर्शन’ ही मालिका दर शुक्रवारी आकाशवाणी रत्नागिरीवरून प्रसारित केली जाते. या भागामध्ये गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिराचा इतिहास, धार्मिक परंपरा, विविध उत्सव, डोंगर प्रदक्षिणा तसेच ग्रामदैवत चंडिका देवी मंदिराची माहिती श्रोत्यांना मिळणार आहे.

गणपतीपुळेचा निसर्गरम्य समुद्रकिनारा आणि तेथील पर्यटन वैशिष्ट्ये यांचाही कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. समुद्रस्नान करताना घ्यावयाची काळजी, सुरक्षिततेचे नियम आणि पर्यटकांनी पाळावयाच्या सूचना याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शनही या कार्यक्रमातून केले जाणार आहे.

कार्यक्रमात संस्थान श्री गणपतीपुळेचे अध्यक्ष श्री. निलेश कोल्हटकर, स्थानिक भाविक सौ. पद्मजा कुमार जोशी तसेच जीवरक्षक उमेश महाद्ये यांचा सहभाग असून त्यांनी गणपतीपुळेच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनविषयक पैलूंवर प्रकाश टाकला आहे.

या कार्यक्रमाचे लेखन सौ. सोनाली संदेश सावंत यांनी केले असून निवेदन व निर्मिती सहाय्य सौ. सोनाली संदेश सावंत आणि सौ. वंदना आशिष मुसळे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सादरीकरण विवेक वानखडे करणार आहेत.

हा कार्यक्रम मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्झ, एफएम 101.5 मेगाहर्ट्झ तसेच ‘न्यूज ऑन एअर’ या मोबाईल ॲपवर ऐकता येणार आहे. प्रसारणानंतर कार्यक्रम ‘AIR Ratnagiri 1248’ या यूट्यूब चॅनलवरही उपलब्ध होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन, संस्कृती आणि धार्मिक वारशाची ओळख करून देणारा हा विशेष कार्यक्रम श्रोत्यांसाठी माहितीपूर्ण आणि आकर्षक ठरणार असून सर्वांनी तो आवर्जून ऐकावा, असे आवाहन आकाशवाणी रत्नागिरी केंद्राकडून करण्यात आले आहे.

Previous Post

दापोलीच्या सुपुत्राची खो-खो स्पर्धेत चमकदार कामगिरी; विनय स्पोर्ट्स नालासोपारा संघाला विजेतेपद

Next Post

ह.भ.प. दिलीप पाटील यांना ‘आदर्श प्रवचनकार – वारकरी भूषण’ राज्यस्तरीय पुरस्कार

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
173
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
51
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
12
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
93
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
19
Next Post
ह.भ.प. दिलीप पाटील यांना ‘आदर्श प्रवचनकार – वारकरी भूषण’ राज्यस्तरीय पुरस्कार

ह.भ.प. दिलीप पाटील यांना ‘आदर्श प्रवचनकार - वारकरी भूषण’ राज्यस्तरीय पुरस्कार

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In