• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ऑनलाइन खरेदीतील ग्राहक फसवणूक चिंताजनक; ‘डार्क पॅटर्न्स’ विरोधात जनजागृती मोहीम राबवणार – सतीश पंच

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 10, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

जालना | प्रतिनिधी

ऑनलाइन खरेदीमध्ये ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या आणि आर्थिक फटका देणाऱ्या ‘डार्क पॅटर्न्स’ या फसव्या डिजिटल पद्धतींबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. बाजार संशोधन संस्था ‘डेटम इंटेलिजन्स’ने प्रसिद्ध केलेल्या ‘डार्क पॅटर्न्स इन इंडियाज ऑनलाइन मार्केट्स’ या अहवालानुसार, देशातील ग्राहकांना अशा फसव्या पद्धतींमुळे दरवर्षी तब्बल २५ ते २८ हजार कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या पार्श्वभूमीवर कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) चे राज्य उपाध्यक्ष तथा जालना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच यांनी चिंता व्यक्त करत ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, देशातील सुमारे ३० कोटी ४० लाख ऑनलाइन खरेदीदारांपैकी ८८ टक्के ग्राहकांना छुपे शुल्क, सक्तीचे अ‍ॅड-ऑन्स, ड्रिप प्रायसिंग, खोट्या तातडीच्या ऑफर्स आणि सबस्क्रिप्शन ट्रॅप्सचा फटका बसत आहे. या प्रकारांमुळे ग्राहकांना दरमहा सरासरी ७८ ते ८७ रुपयांचे अतिरिक्त आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अहवालानुसार, ६३ टक्के ग्राहकांना खरेदीच्या अंतिम टप्प्यावर अतिरिक्त शुल्काचा अनुभव येतो. तसेच अभ्यास करण्यात आलेल्या प्लॅटफॉर्म्सपैकी ७३ टक्के प्लॅटफॉर्म ग्राहकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध निर्णय घेण्यास भाग पाडणाऱ्या यंत्रणा वापरत असल्याचे समोर आले आहे.

सतीश पंच म्हणाले की, ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय अतिरिक्त शुल्क आकारणे हा ग्राहक हक्कांचा भंग आहे. स्थानिक व्यापारी ग्राहकांसमोर पारदर्शक व्यवहार करतात, तर अनेक ऑनलाइन कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि नंतर अतिरिक्त शुल्क आकारण्यासाठी विविध डिजिटल क्लृप्त्या वापरत आहेत. यामुळे बाजारपेठेतील निरोगी स्पर्धेलाही बाधा पोहोचत आहे.

त्यांनी सरकारकडे अशा फसव्या पद्धतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कठोर कायदेशीर यंत्रणा उभारण्याची मागणी केली. तसेच ग्राहकांनी ऑनलाइन व्यवहार करताना अंतिम बिल, अटी व शर्ती आणि अतिरिक्त शुल्क काळजीपूर्वक तपासावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जनजागृती मोहीम राबविणार

जालना व्यापारी महासंघ आणि ‘कॅट’च्या वतीने लवकरच ग्राहक, व्यापारी आणि नागरिकांमध्ये ‘डार्क पॅटर्न्स’विरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे ऑनलाइन खरेदीदरम्यान होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांना माहिती देऊन सावध केले जाणार असल्याचे सतीश पंच यांनी स्पष्ट केले.

अहवालातील महत्त्वाचे निष्कर्ष

  • देशातील ८८% ऑनलाइन ग्राहकांना छुप्या शुल्काचा फटका.
  • ६३% ग्राहकांना अंतिम पेमेंटवेळी अतिरिक्त शुल्काचा अनुभव.
  • ७३% ऑनलाइन प्लॅटफॉर्म ग्राहकांवर सक्तीचे निर्णय लादतात.
  • ग्राहकांना दरवर्षी अंदाजे २५ ते २८ हजार कोटी रुपयांचे नुकसान.
  • ई-कॉमर्स, क्विक कॉमर्स आणि ऑनलाइन ट्रॅव्हल क्षेत्रातील १२ प्रमुख प्लॅटफॉर्म्सचा अभ्यास.

वाढत्या डिजिटल व्यवहारांच्या युगात ग्राहकांनी अधिक जागरूक राहणे आणि प्रत्येक ऑनलाइन व्यवहार काळजीपूर्वक तपासणे आवश्यक असल्याचे मत सतीश पंच यांनी व्यक्त केले.

Previous Post

देविभोयरे ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकले; ११ जागांसाठी रंगणार चुरशीची लढत

Next Post

चामोर्शीत महिलांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा; आरोपीला कठोर शिक्षा देण्याची एकमुखी मागणी

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post
चामोर्शीत महिलांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा; आरोपीला कठोर शिक्षा देण्याची एकमुखी मागणी

चामोर्शीत महिलांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा; आरोपीला कठोर शिक्षा देण्याची एकमुखी मागणी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In