• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चामोर्शीत महिलांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा; आरोपीला कठोर शिक्षा देण्याची एकमुखी मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
चामोर्शीत महिलांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा; आरोपीला कठोर शिक्षा देण्याची एकमुखी मागणी
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

गडचिरोली, चामोर्शी (प्रतिनिधी) :

चामोर्शी येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ १० जून रोजी शेकडो महिलांनी एकत्र येत चामोर्शी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत महिलांनी आरोपीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे” आणि “आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे” अशा घोषणांनी पोलीस स्टेशन परिसर दणाणून गेला. मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहिल्याने काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधत पोलिसांनी तत्पर कारवाई करून आरोपीला अटक केल्याची माहिती दिली. प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आवश्यक प्रक्रिया करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेमुळे संपूर्ण चामोर्शी तालुका हादरला असून पीडितेला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटनांना आळा बसावा, यासाठी नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. महिलांच्या अभूतपूर्व एकजुटीमुळे या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

ऑनलाइन खरेदीतील ग्राहक फसवणूक चिंताजनक; ‘डार्क पॅटर्न्स’ विरोधात जनजागृती मोहीम राबवणार – सतीश पंच

Next Post

लग्नानंतर अवघ्या महिनाभरात नवदाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू; सगनापूर परिसरात हळहळ

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

लग्नानंतर अवघ्या महिनाभरात नवदाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू; सगनापूर परिसरात हळहळ

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In