• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोसारा येथे अवैध दारू विक्रेत्यांवर मारेगाव पोलिसांची धडक कारवाई; 145 दारूच्या बाटल्या जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
कोसारा येथे अवैध दारू विक्रेत्यांवर मारेगाव पोलिसांची धडक कारवाई; 145 दारूच्या बाटल्या जप्त
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

मारेगाव | प्रतिनिधी :

मारेगाव तालुक्यातील कोसारा गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात मारेगाव पोलिसांनी धडक कारवाई करत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मिळालेल्या माहितीनुसार, ग्राम कोसारा येथे काही व्यक्तींकडून अवैधरित्या दारू विक्री केली जात असल्याची माहिती मारेगाव पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचला. काही दिवस गुप्त पद्धतीने हालचालींवर लक्ष ठेवून योग्य संधी साधत पोलिसांनी छापा टाकला.

या कारवाईदरम्यान अमोल नारनवरे आणि सुलोचना नंदलाल जयस्वाल यांच्या ताब्यातून 90 मिली क्षमतेच्या तब्बल 145 दारूच्या काचेच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत अंदाजे सात ते साडेसात हजार रुपये असल्याचे समजते.

या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई मारेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शाम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस कर्मचारी दिगंबर किनाके, बबीता तोडासे, अतुल सरोदे, शंकर बारेकर आणि नरेंद्र तुमराम यांनी सहभाग घेतला.

कारवाईनंतर मारेगाव पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांना कडक इशारा देत अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांवर यापुढेही सातत्याने कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कोणतीही हयगय केली जाणार नसून अवैध दारू विक्री, जुगार, सट्टा आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईमुळे कोसारा परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या धडक कारवाईचे स्वागत केले आहे.

Previous Post

लग्नानंतर अवघ्या महिनाभरात नवदाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू; सगनापूर परिसरात हळहळ

Next Post

जनतेच्या दारी प्रशासन; पाचोऱ्यात जनसमाधान बैठकीत नागरिकांना थेट संवादाची संधी

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post
जनतेच्या दारी प्रशासन; पाचोऱ्यात जनसमाधान बैठकीत नागरिकांना थेट संवादाची संधी

जनतेच्या दारी प्रशासन; पाचोऱ्यात जनसमाधान बैठकीत नागरिकांना थेट संवादाची संधी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In