• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जी.एम. चौधरी तंत्रनिकेतनमध्ये प्रवेशासाठी २२ जूनपर्यंत नावनोंदणी; विद्यार्थ्यांसाठी मोफत सुविधा केंद्र सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
जी.एम. चौधरी तंत्रनिकेतनमध्ये प्रवेशासाठी २२ जूनपर्यंत नावनोंदणी; विद्यार्थ्यांसाठी मोफत सुविधा केंद्र सुरू
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

शहादा | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राबविण्यात येणाऱ्या प्रथम व द्वितीय वर्ष पदविका (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रियेसाठी शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित जी.एम. चौधरी तंत्रनिकेतन येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन नावनोंदणीची अंतिम मुदत २२ जून २०२६ असून विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य बी. के. सोनी यांनी केले आहे.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

दहावी, बारावी तसेच आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षण क्षेत्रातील विविध पदविका अभ्यासक्रमांचे उत्कृष्ट पर्याय या संस्थेत उपलब्ध आहेत. प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होत असून विद्यार्थ्यांना अर्ज भरताना ई-स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी या दोन पर्यायांपैकी एकाची निवड करावी लागणार आहे. अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे आणि नोंदणी निश्चित करणे अनिवार्य आहे.

संस्थेमध्ये प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी पाच प्रमुख शाखांमध्ये प्रवेश सुरू असून प्रत्येक शाखेसाठी ६० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये संगणक अभियांत्रिकी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, विद्युत अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी आणि स्थापत्य अभियांत्रिकी या शाखांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण २४० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

विद्यार्थी व पालकांना प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संस्थेने मोफत मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्राचार्य बी. के. सोनी (९६०४११८७११) तसेच प्रा. सौ. शितल चौधरी (७५८८५१६४३८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तंत्रशिक्षण क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी २२ जूनपूर्वी आपली नावनोंदणी पूर्ण करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जी.एम. चौधरी तंत्रनिकेतन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

घाटली ग्रामपंचायतीत निधीवरून वाद पेटला; जुन्या-नव्या कारभाराच्या चौकशीची मागणी, राजकीय वातावरण तापले

Next Post

वयोश्री योजनेतून १,६५३ ज्येष्ठ लाभार्थ्यांना मोफत सहाय्यक साधनांचे वितरण

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
158
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
27
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
36
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
10
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
90
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
18
Next Post
वयोश्री योजनेतून १,६५३ ज्येष्ठ लाभार्थ्यांना मोफत सहाय्यक साधनांचे वितरण

वयोश्री योजनेतून १,६५३ ज्येष्ठ लाभार्थ्यांना मोफत सहाय्यक साधनांचे वितरण

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In