• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आंबेगावच्या चार युवक-युवतींची PSI पदावर नियुक्ती; तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
आंबेगावच्या चार युवक-युवतींची PSI पदावर नियुक्ती; तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
0
SHARES
40
VIEWS
Ad 1

लोणी | प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील चार होतकरू युवक-युवतींनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाची परीक्षा उत्तीर्ण करत पोलीस सेवेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

नुकतेच वर्षभराचे खडतर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून प्रशांत बबन दांगट, भाग्यश्री जगन्नाथ जाधव, श्वेता सुखदेव करंडे आणि स्वप्निल मच्छिंद्र हिंगे हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत रुजू झाले आहेत.

प्रशांत दांगट (निरगुडसर) हे पत्रकार प्रमोद दांगट यांचे बंधू आहेत. भाग्यश्री जाधव (जाधववाडी) या ज्येष्ठ पत्रकार रमेश जाधव यांच्या पुतणी आहेत. तर श्वेता करंडे (काठापूर) या पत्रकार विशाल करंडे यांच्या भगिनी असून स्वप्निल हिंगे (अवसरी बुद्रुक) हे भीमाशंकर साखर कारखान्याचे अधिकारी रामनाथ हिंगे पाटील यांचे पुतणे आहेत.

या चारही नवोदित अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबासह आंबेगाव तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.

नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे आयोजित भव्य दीक्षांत समारंभात राज्याचे सदानंद दाते यांच्या हस्ते एकूण ५८३ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांना पदवी प्रदान करण्यात आली. याच समारंभात आंबेगाव तालुक्यातील या चार युवक-युवतींनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस सेवेत प्रवेश केला.

दीक्षांत समारंभात आपल्या मुलांना खाकी वर्दीत पाहताना अनेक पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. कुटुंब, गाव आणि तालुक्याचा गौरव वाढविणाऱ्या या नवोदित अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ग्रामीण भागातून पुढे आलेल्या या चारही युवक-युवतींनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर आपले ध्येय गाठत इतर तरुणांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. जनतेची सेवा, कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडत त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Previous Post

दोंडाईचात ५६ रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड; ‘प्रविण आय क्लिनिक’चा ३१ वा वर्धापनदिन उत्साहात

Next Post

पनवेलमधील वाढत्या गैरप्रकारांविरोधात मनसे आक्रमक; पोलीस उप-आयुक्त रश्मी नांदेडकर यांना निवेदन

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
30
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
पनवेलमधील वाढत्या गैरप्रकारांविरोधात मनसे आक्रमक; पोलीस उप-आयुक्त रश्मी नांदेडकर यांना निवेदन

पनवेलमधील वाढत्या गैरप्रकारांविरोधात मनसे आक्रमक; पोलीस उप-आयुक्त रश्मी नांदेडकर यांना निवेदन

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In