• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पनवेलमधील वाढत्या गैरप्रकारांविरोधात मनसे आक्रमक; पोलीस उप-आयुक्त रश्मी नांदेडकर यांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
पनवेलमधील वाढत्या गैरप्रकारांविरोधात मनसे आक्रमक; पोलीस उप-आयुक्त रश्मी नांदेडकर यांना निवेदन
0
SHARES
34
VIEWS
Ad 1

पनवेल-कळंबोली | प्रतिनिधी :

खारघर, कामोठे आणि कळंबोली परिसरातील मुख्य रस्ते, चौक तसेच सेवा रस्त्यांवर रात्रीच्या वेळी वाढलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे महिला सेनेच्या पनवेल महानगर अध्यक्षा स्वरूपा सुर्वे यांनी नवनियुक्त पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-३) रश्मी नांदेडकर यांची सदिच्छा भेट घेऊन परिसरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली आणि निवेदन सादर केले.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

निवेदनात खारघर, कामोठे आणि कळंबोली परिसरातील काही अंधारे भाग, मुख्य रस्ते आणि सेवा रस्त्यांवर रात्रीच्या वेळी संशयास्पद हालचाली वाढल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यामुळे स्थानिक नागरिक, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे मनसेच्या शिष्टमंडळाने नमूद केले.

स्वरूपा सुर्वे यांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त वाढविणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रभावी वापर करणे, गुप्त पथकांच्या माध्यमातून देखरेख वाढविणे आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी पोलीस उप-आयुक्त रश्मी नांदेडकर यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित भागांमध्ये आवश्यक त्या कायदेशीर आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

या भेटीदरम्यान मनसेचे पनवेल महानगर सचिव पराग बालड, पनवेल उपशहर अध्यक्षा साक्षी दळवी, नवीन पनवेल शहर सचिव मनीषा देशमुख, नवीन पनवेल उपशहर अध्यक्षा मानसी सकपाळ, उपशहर अध्यक्ष रोहन पाटील, हर्ष खैरे, दीपेश पोपटा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मनसेने उचललेल्या या पावलाचे परिसरात स्वागत होत असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

आंबेगावच्या चार युवक-युवतींची PSI पदावर नियुक्ती; तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

Next Post

पनवेलमधील वीज समस्येवर उच्चस्तरीय बैठक; उपमहापौर प्रमिला पाटील यांचे ऊर्जा राज्यमंत्र्यांना निवेदन

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
100
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
पनवेलमधील वीज समस्येवर उच्चस्तरीय बैठक; उपमहापौर प्रमिला पाटील यांचे ऊर्जा राज्यमंत्र्यांना निवेदन

पनवेलमधील वीज समस्येवर उच्चस्तरीय बैठक; उपमहापौर प्रमिला पाटील यांचे ऊर्जा राज्यमंत्र्यांना निवेदन

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In