• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पनवेलमधील वीज समस्येवर उच्चस्तरीय बैठक; उपमहापौर प्रमिला पाटील यांचे ऊर्जा राज्यमंत्र्यांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
पनवेलमधील वीज समस्येवर उच्चस्तरीय बैठक; उपमहापौर प्रमिला पाटील यांचे ऊर्जा राज्यमंत्र्यांना निवेदन
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

पनवेल-कळंबोली | प्रतिनिधी :

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील, विशेषतः कळंबोली आणि कामोठे परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या दालनात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत वीज समस्येच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

बैठकीस प्रशांत ठाकूर, महेश बालदी, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, नगरसेवक अमर पाटील, विकास घरत यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे भेडसावणाऱ्या अडचणींबाबत उपस्थितांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

यावेळी उपमहापौर प्रमिला पाटील यांनी ऊर्जा राज्यमंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनात कळंबोली सेक्टर १२ ते १५ मधील बीयूडीपी क्षेत्र तसेच एलआयजी व केएल-१ ते केएल-६ परिसरातील जुनी आणि जीर्ण झालेली वीज यंत्रणा तातडीने बदलण्याची मागणी करण्यात आली.

सुमारे दोन दशकांपूर्वी उभारण्यात आलेल्या वीज वाहिन्या, खांब आणि फीडर पिलर्स कालबाह्य झाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले.

बैठकीदरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समस्येची गांभीर्याने दखल घेत आवश्यक तांत्रिक सुधारणा, नियमित देखभाल तसेच नवीन वीज वाहिन्या आणि फीडर पिलर्स उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. संबंधित भागाची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक निधी आणि नियोजनाद्वारे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पनवेलकरांना अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करत असून नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

या बैठकीमुळे कळंबोली, कामोठे आणि पनवेल परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित वीज समस्यांच्या निराकरणाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Tags: Shrinath Laad
Previous Post

पनवेलमधील वाढत्या गैरप्रकारांविरोधात मनसे आक्रमक; पोलीस उप-आयुक्त रश्मी नांदेडकर यांना निवेदन

Next Post

कळंबोलीत सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याविरोधात नागरिकांचा संताप; महावितरण कार्यालयावर धडक

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
100
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
192
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
कळंबोलीत सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याविरोधात नागरिकांचा संताप; महावितरण कार्यालयावर धडक

कळंबोलीत सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याविरोधात नागरिकांचा संताप; महावितरण कार्यालयावर धडक

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In