• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मैत्रीचा आदर्शवत नमुना; मित्राच्या निधनानंतर कुटुंबासाठी ग्रामस्थांनी उभारला सव्वाचार लाखांचा मदतनिधी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in Blog
0
मैत्रीचा आदर्शवत नमुना; मित्राच्या निधनानंतर कुटुंबासाठी ग्रामस्थांनी उभारला सव्वाचार लाखांचा मदतनिधी
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

लोणी, प्रतिनिधी :

मैत्री ही केवळ सुख-दुःखात साथ देण्यापुरती मर्यादित नसून, मित्राच्या पश्चात त्याच्या कुटुंबालाही आधार देण्याची भावना आंबेगाव तालुक्यातील रानमळा ग्रामस्थांनी कृतीतून दाखवून दिली आहे.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

रानमळा येथील ३८ वर्षीय शेतकरी संतोष दीपक सिनलकर यांच्या अकाली निधनानंतर अवघ्या सहा दिवसांत मित्रमंडळी, ग्रामस्थ, सामाजिक संस्था व विविध संघटनांनी एकत्र येत त्यांच्या कुटुंबासाठी सुमारे सव्वाचार लाख रुपयांचा मदतनिधी उभारला.

संतोष सिनलकर हे शेती व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. मंगळवार (दि. २) रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे अचानक निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर कुटुंबाला आर्थिक व मानसिक आधाराची गरज ओळखून सरपंच राजू सिनलकर, दीपक वाळुंज, कमलेश सिनलकर, प्रकाश गायकवाड, शंकर सिनलकर, जगन्नाथ लंके यांच्यासह मित्रमंडळी व ग्रामस्थ पुढे सरसावले. सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करण्यात आले आणि नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

केवळ २०० रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत विविध स्वरूपात मदत जमा झाली. शिवसेना नेते रमेश येवले यांनी ५० हजार रुपयांची मदत केली. तसेच गिरवली येथील श्रीराम गुरुकुलचे विकास महाराज हगवणे यांनी संतोष सिनलकर यांच्या एका मुलाच्या शिक्षणासाठी पुढील तीन वर्षे दरवर्षी २५ हजार रुपये देण्याची घोषणा केली.

इयत्ता दहावी बॅच २००४-०५, हेमंत पडवळ, लोणी-धामणी भाजपा परिवार तसेच विविध मान्यवर व सामाजिक कार्यकर्त्यांनीही आर्थिक सहकार्य केले. सुमारे २५० हून अधिक दानशूर व्यक्तींच्या सहभागातून सव्वाचार लाख रुपयांचा निधी उभा राहिला.

दशक्रिया विधीच्या दिवशी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी उपाध्यक्ष अरुण गिरे तसेच परिसरातील विविध गावांचे लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ही रक्कम दिवंगत संतोष सिनलकर यांच्या मुलांच्या नावाने बँकेत मुदत ठेव स्वरूपात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संकटाच्या काळात समाज एकत्र येऊन कुटुंबाला आधार देऊ शकतो, याचे प्रेरणादायी उदाहरण रानमळा ग्रामस्थांनी घालून दिले आहे. या माणुसकीच्या कार्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून मैत्री, सामाजिक बांधिलकी आणि सहकार्याचा आदर्श म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

Previous Post

वाळुंजनगरच्या कु. आकांक्षा वाळुंज यांचे एमबीबीएस पदवीत घवघवीत यश; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव

Next Post

ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने शिवछत्रपती कर्तृत्व गौरव पुरस्कार व स्पर्धा परीक्षा यशवंतांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
2
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
9
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
6
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
2
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने शिवछत्रपती कर्तृत्व गौरव पुरस्कार व स्पर्धा परीक्षा यशवंतांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने शिवछत्रपती कर्तृत्व गौरव पुरस्कार व स्पर्धा परीक्षा यशवंतांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In