• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सिताबाई थिटे डी. फार्मसी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

शिरूर | प्रतिनिधी

जागतिक नेत्रदान दिनाचे औचित्य साधून श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्था संचलित सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म.) राष्ट्रीय सेवा योजना युनिट आणि आनंद ऋषीजी नेत्रालय व्हिजन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

शिबिरामध्ये नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी, चष्म्याचा नंबर तपासणी तसेच विविध नेत्रविकारांचे निदान करून तज्ज्ञांकडून योग्य वैद्यकीय सल्ला देण्यात आला. तपासणीदरम्यान मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांना आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला देण्यात आला.

यावेळी नेत्रतज्ज्ञ डॉ. रोहित स्वामी आणि संदीप पाडोळे यांनी नेत्रदानाचे महत्त्व, त्यासंदर्भातील समज-गैरसमज तसेच दृष्टीहीन व्यक्तींना नवजीवन देण्यासाठी नेत्रदानाची आवश्यकता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. समाजामध्ये नेत्रदानाबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

या शिबिरात डी. फार्मसी, बी. फार्मसी, नर्सिंग महाविद्यालय तसेच विजयामाला स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि नागरिक अशा एकूण १९७ जणांनी सहभाग नोंदवून लाभ घेतला.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे यांनी ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. त्यांनी नेत्र तपासणीचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन केले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शहा, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक प्रा. विशाल कारखिले, प्रा. निखिल केदारी, प्रा. निशा केसकर, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

“नेत्रदान हेच श्रेष्ठ दान, अंधत्वमुक्त भारताचे अभियान” हा समाजप्रबोधनाचा संदेश देत शिबिराची सांगता करण्यात आली.

Previous Post

लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याण विभागाचा निधी वळविल्याचा आरोप; उत्कर्षा रूपवते यांची टीका

Next Post

कोळेगावात वैध-अवैध दारू धंद्यांचा सुळसुळाट; ८७० महिलांच्या सह्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
58
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
81
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post

कोळेगावात वैध-अवैध दारू धंद्यांचा सुळसुळाट; ८७० महिलांच्या सह्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In